गोव्यात आप’ची डॉक्‍टर हेल्‍पलाईन सुरू

doctor
doctor

पणजी: कोविडची (Covid) लागण झालेल्या किंवा कोविडची लक्षणे असलेल्यांना पॉझिटिव्ह (Positive) किंवा  मोफत  वैद्यकीय सल्ला देण्यासाठी आम आदमी पार्टीने डॉक्टर हेल्पलाईन सुरू केली आहे. 7504750475 या क्रमांकावर सकाळी 10 ते सायंकाळी 6 यावेळेत ही मोफत सल्ला सेवा उपलब्ध असेल. हेल्पलाईन सुविधेच्या सुरू करण्याच्या प्रसंगी ‘आप’ गोवाचे संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले की, ‘आम्ही आजपासून ही हेल्पलाईन सुरू करत आहोत. जे कोरोना रुग्ण गृह विलगीकरणात आहेत, किंवा ज्यांना कोरोनाची लक्षणे दिसत आहे, त्यांना वैद्यकीय सल्ल्याच्या मदत मिळावी या हेतूने ही हेल्पलाईन सुरू करत आहोत. राज्य सरकारच्या आजवरच्या भोंगळ कारभारामुळे आरोग्यसेवा पूर्णतः कोलमडली परिणामतः गोमंतकीयांना प्रचंड हाल-अपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. (Aap Doctor Helpline starts in Goa) 

परंतु या कठीण परिस्थितीत आम्ही त्यांच्या मदतीसाठी सदैव आहोत. ज्याला वैद्यकीय सल्ल्याची आवश्यकता आहे, तो आता या हेल्पलाइनवर कॉल करू शकतो आणि डॉक्टरांच्या भेटीसाठी वाट पाहण्याशिवाय उपचार मिळवू शकतो. आम्हाला आशा आहे की, ही सुविधा जनतेला मदत करेल.
दिल्ली सरकारचा प्रयोग यशस्‍वी ‘आप’च्या नेतृत्वाखालील दिल्ली राज्यसरकारने गेल्या वर्षी गृह विलगीकरणासाठी पुढाकार घेतला. ती पद्धत आता संपूर्ण भारतात आणि जगभरात वापरली जात आहे. आज, हा प्रयोग जगासाठी संशोधनाचा विषय बनलेला आहे. ज्याचा उपयोग सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी केला जातो.

यामुळे, गंभीर रूग्णांसाठी रुग्णालयाच्या खाटा मोकळ्या होण्यास मदत होते. आणि या गृह विलगीकरणाच्या मॉडेल अंतर्गत दिल्ली सरकार दूरसंचार सुविधांच्या माध्यमातून रुग्णांच्या वैद्यकीय स्थितीवर लक्ष ठेवते.  घरातच विलगीकरणात असलेल्या रुग्णांना त्यांचे आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी आणि आवश्यक ती मदत देण्यासाठी दररोज दिल्ली सरकारच्यावतीने डॉक्टर आणि परिचारिकांकडून कॉल येत असतात व रुग्णाशी थेट संवाद साधला जातो.  यासह, या कठीण परिस्थितीत मानसिक तणाव दूर करण्यासाठी देखील डॉक्टरांकडून समुपदेशन केले जाते. रुग्णांना दररोज मनोबल वाढवणारे कॉल येतात आणि परिणामी त्यांचा चांगला परिणाम होतो.

फोनद्वारे रुग्‍णाची चौकशी

म्हांबरे यांनी सांगितले, की अलीकडेच, दिल्लीतील कोविड रूग्ण इशिता चौधरी, ज्यांनी गृहअलगीकरणात राहूनच उपचार घेतले आणि ठीक झाल्या. त्यांनी कोविड दरम्यानच्या काळातला आपला  सकारात्मक अनुभव सर्वांसमोर सोशल मीडियाच्या माध्यमातून सामायिक केला. त्यांनी त्यात म्हटले की, ‘गेल्या १० दिवसांपासून मी कोविडबाधित होते. जेव्हापासून माझी चाचणी कोरोनाबाधित आली, तेव्हापासून एकही दिवस न चुकता, मला दररोज दिल्ली सरकारच्या आरोग्य विभागाचा सकाळी आणि सायंकाळी फोन यायचा. यापूर्वी मला माहित नव्हते की, अशीही काळजी घेणारे सरकार असू शकते.  ते काय देऊ शकतात आणि काय नाही, एकंदरीत सर्वच प्रकारे उत्तम मार्गदर्शन मला मिळाले’, असे सांगताना  चौधरी पुढे म्हणाल्या की, ‘न चुकता दररोज कॉल केल्याबद्दल सरकारचे धन्यवाद.

आणि आम आदमी पार्टी ही जबाबदारी स्वीकारत आहे.  आम्ही ही हेल्पलाइन चालवू आणि आज गोमंतकीयांना आवश्यक असलेली मदत करू. आम्ही गोमंतकीयांची काळजी घेत आहोत आणि त्यांची काळजी घेण्यासाठी सर्व काही प्रयत्न करू.
- राहुल म्‍हांबरे, ‘आप’ गोवाचे संयोजक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com