Sanquelim Muncipal Council: 'आप', गोवा फॉरवर्डची साखळी नगरपरिषदेच्या सीओंवर टीका...

सीओंचा नगराध्यक्षांसोबत वाद; चुकीची वागणूक दिल्याचा आरोप
Sankhali Muncipal Council
Sankhali Muncipal CouncilDainik Gomantak

Sankhali Muncipal Council: साखळी नगरपरिषदेचे सीओ (चीफ ऑफिसर) कबीर शिरगावकर आणि नगराध्यक्ष राजेश सावळ यांच्यातील वाद आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. शहरातील बेकायदा होर्डिंग्ज काढण्याबाबत नगराध्यक्ष सावळ यांनी सीओ शिरगावकर यांना आदेश दिले होते, त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचे समजते. हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेले आहे, तथापि, अद्याप कुणीही तक्रार दिलेली नाही.

Sankhali Muncipal Council
Goa Helicopter Ride: गोव्यात आज हेलिकॉप्टर सेवेचा शुभारंभ; पर्यटकांना आसमंतातून घेता येणार विहंगम दर्शन

दरम्यान, या मुद्यावरून गोवा फॉरवर्ड आणि आम आदमी पक्षानेही सीओ कबीर शिरगावकर यांच्यावर टीका केली आहे. साखळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेश सावळ यांच्यावर कारवाईसाठी भाजप सरकारने सीओ शिरगावकर यांना फ्री हँड दिला आहे.

त्यामुळे कबीर शिरगावकर यांनी राजीनामा देऊन अधिकृतपणे भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करावा, अशी टाकी गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत यांनी केली आहे. याबाबत मुख्य सचिव याबाबत कारवाई करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Sankhali Muncipal Council
King Momo Carnival 2023: यंदाच्या कार्निव्हलसाठी किंग मोमो म्हणून 'यांची' निवड

दरम्यान, आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. अमित पालेकर यांनीही सीओंवर टीका केली आहे. लोकांनी निवडून दिलेल्या नगराध्यक्षांना सीओंकडून अशा पद्धतीची वागणून मिळणे हे लोकशाहीविरोधी आहे, असे पालेकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, यापुर्वीही साखळीमध्ये सेव्ह म्हादई चळवळीसाठी सर्वपक्षीय सभेचे आयोजन केले होते. तेव्हाही आधी त्या सभेला परवानगी दिली गेली होती, पण नंतर त्या सभेला विरोध केला गेला होता. त्यावरूनही नगराध्यक्ष आणि सीओ यांच्यात धुसफुस झाली होती, अशी चर्चा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com