
Manish Sisodia Arrest : दिल्लीच्या मद्यधोरणप्रकरणी रविवारी सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केल्याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर निदर्शने केली.
‘आप’चे आमदार व्हेंझी व्हिएगस, आमदार क्रुझ सिल्वा, पक्षीय नेते वाल्मिकी नाईक, उपेंद्र गावकर व इतर मान्यवरांची उपस्थिती होती. भाजप कार्यालयासमोर सीबीआय आणि भाजपविरोधात आपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
नाईक म्हणाले, सीबीआयने सिसोदिया यांना अटक करून लोकशाहीचा खून केला आहे. आप पक्ष फोडण्यासाठी भाजपने सिसोदिया यांना मुख्यमंत्र्यांची ऑफर दिली होती. आम आदमी पक्ष दिल्लीत चांगले काम करीत असून, ते भाजपला पहावत नाही.
सिसोदियासारख्या प्रामाणिक लोकांना अटक केली जाते. जे घोटाळे करतात, त्या गौतम अदानीला हातही लावू शकत नाहीत. दहा वर्षांपूर्वी भाजपने ‘दामाद श्री’ हे रॉबर्ट वाड्रा यांच्यावर पुस्तक आणि लघुपट काढला होता. परंतु रॉबर्ट वाड्रा यांना अटकही होत नाही.
सीबीआय फक्त आम आदमी पक्षाच्या नेत्यांच्या पाठिमागे लागली आहे. सिसोदिया यांना सोडत नाहीत, तोपर्यंत ‘आप’ची निदर्शने चालूच राहतील. सध्या जे सर्व्हेक्षण सुरू असून, त्यात आम आदमी पक्षाचे (AAP) अरविंद केजरीवाल आणि सिसोदिया यांचे नाव आघाडीवर आहे, ही बाब भाजपला रुचत नाही.
सिसोदिया यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामगिरीची दखलही न्यूयार्क टाईम्सने घेतली आहे. चांगले काम करणारे भाजपला टोचतात, त्यामुळेच भाजपने सीबीआयमार्फत त्यांना अटक केल्याचा गोव्यातील आपचे कार्यकर्ते निषेध व्यक्त करीत असल्याचे ते म्हणाले.
आमदार व्हिएगस म्हणाले, आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून आपली प्रतिमा निर्माण करणाऱ्या सिसोदिया यांना अटक करणे, ही निषेधार्थ बाब आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.