आम आदमी पक्षाला फटका; प्रदिप घाडी आमोणकर यांचा सक्रिय राजकारणाला रामराम !

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑक्टोबर 2020

पक्ष सध्या बहूजन समाजाच्या चेहऱ्याच्या शोधात आहे. राज्य संयोजकपद बहूजन समाजाच्या नेत्याकडे द्यावे, असा विचार आम आदमी पक्षाने चालवला आहे. त्या पदासाठी आपला विचार झाला नाही, म्हणून घाडी आमोणकर नाराज झालेत का? हे अद्याप समजू शकले नाही.

पणजी- आम आदमी पक्षाचा आणखीन एक मोहरा गळाला आहे. राज्य समन्वयक पदावरून एल्विस गोम्स यांना दूर केल्यानंतर पक्षाची भूमिका थिवी मतदारसंघात हिरीरीने पुढे घेऊन जाणारे आणि पक्षाचे एकेकाळचे उमेदवार प्रदीप घाडी आमोणकर यांनी आता राजकारणातून अंग काढून घेतले आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीतूनही अंग काढून घेतले आहे. आम आदमी पक्षात आता आपण सक्रिय नाही, असे त्यांनी पक्षाला कळवले आहे. 

पक्ष सध्या बहूजन समाजाच्या चेहऱ्याच्या शोधात आहे. राज्य संयोजकपद बहूजन समाजाच्या नेत्याकडे द्यावे, असा विचार आम आदमी पक्षाने चालवला आहे. त्या पदासाठी आपला विचार झाला नाही, म्हणून घाडी आमोणकर नाराज झालेत का? हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, दूरध्वनीवर संपर्क साधला असता आपण पक्षात आहे, पण सक्रिय नाही. मी निवडणूक लढवणार नाही. मात्र, यामागे कारण वेगळे आहे. 

दरम्यान, एल्विस गोम्स यांना संयोजकपदावरून दूर केल्याचा परिणाम काय? याची चाचपणी पक्षाने सुरू केली आहे. त्यासाठी ऑ क्सीमीटर मोहिमेचे प्रमुख म्हणून कार्यरत असलेले अंकूश नारंग यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांची भेट घेण्याचे सुरू केले आहे. ते भेटलेल्या चारही उमेदवारांनी गोम्स वगळता विजय मिळवणे कठीण असल्याचे सांगितले. एका उमेदवाराने गोम्स वजा केल्यास पक्ष शिल्लक तरी किती उरतो, अशी विचारणा केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. त्यामुळे गोम्स यांनी आणखी दूर जावू नये, यासाठी काय करावे याची रणनीती आखण्याची गरज वाटू लागली आहे.   

संबंधित बातम्या