AAP Goa : सिल्वेरांनी विकासकामे अडवू नयेत : वाघ

राखीव जागा देण्याच्या निर्णयाचे स्वागत
AAP Leader Ramrao Wagh
AAP Leader Ramrao WaghDainik Gomantak

सांतआंद्रे मतदारसंघात रिव्होल्युशनरी गोवन्सचे आमदार विरेश बोरकर व माजी आमदार तथा गोवा अल्पसंख्याक वित्तीय महामंडळ अध्यक्ष फ्रान्सिस सिल्वेरा यांच्यात जो शाब्दिक वाद सुरू आहे, तो योग्य नाही. विकासकामे अडवून ठेवण्याचे काम सिल्वेरा यांनीही टाळावे, त्याचबरोबर आरजीच्या लोकांनीही होणाऱ्या टीकेकडे दुर्लक्ष करावे, असा सल्ला आम आदमी पक्षाचे नेते प्रा. रामराव वाघ यांनी दिला आहे.

गेली काही दिवसांपासून सिल्वेरा व बोरकर यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. सिल्वेरा हे ज्येष्ठ नेते आहेत, विकासाला आडकाठी घालणे योग्य नाही. आम्हीही विरोध करीत असतो, पण किमान आमदार म्हणून ज्यांना निवडून दिले आहे, त्यांना काम करू द्यावे.

खाजन शेतीविषयीचे अनेक प्रकार घडले आहेत. एका खाजन शेतीचा बांध मोडलेला आहे, त्यावर अद्याप उपाययोजना होत नाही. या समस्येकडे माजी आमदार सिल्वेरा यांनी का लक्ष दिले नाही. दोन्ही आमदारांनी हे काम न केल्यास आजोशी व डोंगरी गावात पाणी साचेल, अशी माहिती वाघ यांनी दिली.

AAP Leader Ramrao Wagh
Goa Shacks : शॅक्स उभारणीसंदर्भात कायद्यात दुरुस्तीची गरज : लोबो

राखीव जागा देण्याच्या निर्णयाचे स्वागत

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ओबीसी, एसटी आणि एससी विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा देण्याचा सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आम आदमी पक्षाने स्वागत करीत आहे. गोमेकॉने सार्वजिनिक आरोग्य विभागाकडे आरक्षणाविषयी प्रस्ताव पाठविला पाहिजे आणि समाज कल्याण खात्याने ते रोस्टर करायला हवे.

पदव्युत्तर अभ्यासक्रमाची जी नीट परीक्षा झाली आहे. आता १५ जुलैपासून प्रवेशासाठीचे समुपदेशन सुरू होईल. परंतु सरकारने राखीव जागा जाहीर केल्या, परंतु त्याचा उल्लेख प्रवेश मार्गदर्शनक्रमिकेत (प्रोस्पेट) यायला हवे. ही प्रक्रिया लवकरात लवकर व्हावी. कारण यावर्षीच्या विद्यार्थ्यांना या आरक्षणाचा फायदा होईल, असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com