
Aam Aadmi Party : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका आणि यासंबंधी विरोधी पक्षांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार यासाठीच्या हालचालींना वेग आल्याने आम आदमी पक्षाचे राज्य संघटक ॲडव्होकेट अमित पालेकर व दोन्ही आमदार आज तातडीने दिल्लीला रवाना झाले.
लोकसभा निवडणुकीसाठी हालचालींना वेग आला असून, भाजप विरोधात सर्व पक्षांनी एकत्रित यावे यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. याचाच भाग म्हणून आपतर्फे दिल्लीत शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. यासाठी पक्षाने आपले सर्व राज्यांतील नेते, आमदार यांना दिल्लीला तातडीने बोलावले आहे.
पक्षाची उद्या बुधवारी बैठक बोलावण्यात आली असून, या बैठकीत पुढील रणनीती ठरवण्यात येणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे. या बरोबरच सत्ताधारी भाजपकडून होणाऱ्या रणनीतीसंबंधी या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
सर्व पक्षांना साद
दिल्ली सरकारच्या अधिकारांवर अतिक्रमण करणाऱ्या केंद्राच्या अध्यादेशाविरोधात सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन करत केजरीवाल यांनी भेटीगाठी सुरू केल्या. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाला वळसा घालून राज्यपालांच्या हातीच सूत्रे देणाऱ्या प्राधिकरणाची स्थापना करण्याचा अध्यादेश केंद्राने काढला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.