Goa: आम आदमी पक्षाची मडगावात निदर्शने

गोव्यात (Goa) पेट्रोलच्या (Petrol Prices) दराने शंभरी पार केल्याने आपच्‍या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी मडगाव (Madgaon) परिसरातील पेट्रोल पंपाजवळ निदर्शने केली.
Goa: आम आदमी पक्षाची मडगावात निदर्शने
Goa: Aam Adami Party Protesting near Petrol Pump in Madgaon.Daily Gomantak

सासष्टी : कोरोनामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांच्या खिशाला वाढत्या इंधन दरवाढीने कात्री लागत आहे. गोव्यात पेट्रोलच्या दराने १०० रुपयांचा (Petrol Price In Goa Over 100 Rupees) टप्पा पार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पेट्रोलचे दर वाढवून जनतेचे अच्छे दिन (Acche Din) आल्याचे सिद्ध केले आहे, अशी टीका आम आदमी पक्षाच्या नेत्‍या प्रतिमा कुतिन्हो यांनी केली.

Goa: Aam Adami Party Protesting near Petrol Pump in Madgaon.
Goa: भाजपा आणि कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मगो पक्षात केला प्रवेश

गोव्यात पेट्रोलच्या दराने शंभरी पार केल्याने आपच्‍या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी मडगाव परिसरातील पेट्रोल पंपाजवळ निदर्शने केली व केक कापून सरकार विरोधात घोषणा देऊन निषेध केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना प्रतिमा कुतिन्हो यांनी वरील टीका केली. यावेळी आपचे प्रवक्ते संदेश तळेकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त असताना नागरिकांना महागाईचा मार सहन करावा लागत आहे. पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडत असल्याने परराज्यातून येणाऱ्या वस्तूंच्या किमतीतही वाढ झाली आहे, असे कुतिन्हो यांनी सांगितले. राज्यातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी गोव्यातही दिल्ली मॉडेल आणणे आवश्यक असून यासाठी जनतेने विचार करून लोकप्रतिनिधी निवडला पाहिजे, असे संदेश तळेकर यांनी सांगितले.

Goa: Aam Adami Party Protesting near Petrol Pump in Madgaon.
गोव्यात चिकन मार्केटवर अन्न औषध प्रशासनाची कारवाई

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com