'गोव्यात अजूनही लोकांना उघड्यावर शौचास बसावे लागते'

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

मागील वर्षी गोवा राज्य हे उघड्यावर शौचालय मुक्त झाले असल्याचे सरकारने जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात हजारो लोकांपुढे आजही उघड्यावर शौचाला जाण्याशिवाय पर्याय नाही.

 पणजी- राज्य सरकारने खोटे बोलून गरिबांचा आणि मागासवर्गीयांचा शौचालयांसाठीचा निधी बळकावला असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. सरकारने प्रत्येक घरापर्यंत बायो शौचालय पुरवण्याचे दिलेले आश्वासन फसवेगिरी करणारे असल्याचेही यावेळी आम आदमी पक्षाचे प्रवक्ते संदेश तेळेकर यांनी म्हटले आहे.      

मागील वर्षी गोवा राज्य हे उघड्यावर शौचालय मुक्त झाले असल्याचे सरकारने जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात हजारो लोकांपुढे आजही उघड्यावर शौचाला जाण्याशिवाय पर्याय नाही. संगम तालुक्यातील 4 गाव असे आहेत ज्यात अजूनही 150 घरांमध्ये  शौचालयेच नाहीत, याकडे संदेश यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.   

राज्य सरकारने नागरिकांना बायो शौचालयांसाठी पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, एक वर्षाचा कालावधी उलटून गेल्यावरही लोकांना या सुविधेचा लाभ मिळाला नाही. राज्य उघड्यावर शौचालय मुक्त झाल्याचा शीर्षक सरकारने फक्त त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या अर्जांच्या आधारे देण्यात आले आहे. वास्तव हे नसून फक्त मुख्यमंत्र्यांच्या डोक्यातच राज्य उघड्यावर शौच मुक्त झाले असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.     

संबंधित बातम्या