आप प्रवक्ते राघव चढ्ढांनी स्वीकारले वीजमंत्री काब्रालांचे आव्हान

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

आपचे प्रवक्ते राघव चढ्ढा यांनी वीजमंत्री नीलेश काब्राल यांचे आव्हान स्वीकारले आहे. ज्यात त्यांनी दिल्ली सरकारच्या इलेक्ट्रिसिटी मॉडेलला विरुद्ध गोवा मॉडेलला आव्हान दिले होते आणि जाहीर चर्चा करण्यास सांगितले होते.

पणजी :  आपचे प्रवक्ते राघव चढ्ढा यांनी वीजमंत्री नीलेश काब्राल यांचे आव्हान स्वीकारले आहे. ज्यात त्यांनी दिल्ली सरकारच्या इलेक्ट्रिसिटी मॉडेलला विरुद्ध गोवा मॉडेलला आव्हान दिले होते आणि जाहीर चर्चा करण्यास सांगितले होते.चढ्ढा यांनी ट्विटरवर नमूद केले आहे, की गोव्याचे वीजमंत्री, निलेश काब्राल यांनी दिल्लीच्या विद्युत मॉडेलला आव्हान दिले आहे (ज्यामध्ये लोकांना २४ तासांची अखंडित वीज मिळते). मिस्टर काब्राल, मी १७ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत गोव्यात पोहोचणार आहे आणि तुम्ही मला चर्चेचे ठिकाण आणि वेळ कळवा, असे चढ्ढा यांनी काब्राल यांना आव्हान दिले आहे.

संबंधित बातम्या