मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर 'आप'ची निदर्शने

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

मुख्यमंत्र्यांना निवेदन आणि कोळसा भेट द्यायची मागणी करत मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आपच्या कार्यकर्त्यांना पणजी पोलिसांनी ताब्यात घेतले.

पणजी- आल्तीन्हो येथील मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सरकारी बंगल्यावर आज जोरदार निदर्शने करण्यात आली. 'गोवा फॉर गोवन्स नॉट फॉर अदानी', अशा घोषणा देत आम आदमी पक्षाने मोर्चा काढला होता. 

 आम आदमी पक्षाचे निमंत्रक राहुल म्हांबरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या निवास स्थानाकडे येत असताना हा मोर्चा पोलिसांनी अडवला. मुख्यमंत्र्यांना निवेदन आणि कोळसा भेट द्यायची मागणी करत मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आपच्या कार्यकर्त्यांना पणजी पोलिसांनी ताब्यात घेतले.

संबंधित बातम्या