AAP-Trinamool Congressकडून कॉंग्रेसच्या नेत्यांना करोडो रुपयांची आमिषे

गोव्यात अनेक वर्षे काम केलेल्या समविचारी पक्षासोबत कॉंग्रेस युतीची बोलणी करण्यास तयार आहे. मात्र जे पक्ष फक्त गोव्यात कॉंग्रेसची मते फोडण्यासाठी आलेत, त्यांच्यासोबत युती होणार नाही.
AAP-Trinamool Congressकडून कॉंग्रेसच्या नेत्यांना करोडो रुपयांची आमिषे
AAP-Trinamool Congress lures crores of rupees to Congress leadersDainik Gomantak

पणजी: गोव्यात (Goa) प्रत्यक्ष काम न करता फक्त निवडणुकीवर डोळा ठेऊन गोव्यात दाखल झालेल्या आम आदमी पक्ष (AAP) व तृणमूल कॉंग्रेस (Trinamool Congress) या पक्षाकडून कॉंग्रेसच्या नेत्यांना करोडो रुपयाची आमिषे दाखवली जात आहेत. काही नेते या आमिषाना बळी पडून पक्ष सोडून गेले. असा आरोप गोवा कॉंग्रेसचे प्रभारी दिनेश राव यांनी आज केला. आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राव यांनी हे आरोप केले. यावेळी गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधीपक्षनेते दिगंबर कामत, प्रदेश कार्याध्यक्ष आलेक्स सिक्वेरा व माध्यम विभागाचे प्रमुख अमरनाथ पणजीकर उपस्थित होते.

AAP-Trinamool Congress lures crores of rupees to Congress leaders
Goa-Karnataka 'सागर शक्ती' नौकानयन मोहिमेला मुख्यमंत्र्यांनी दाखवला झेंडा

देशात कॉंग्रेस विरोधात दोन शक्ती कार्यरत आहेत. एक भाजप जो धर्माचे राजकारकण करत आहे व दुसरी शक्ती विविध राज्यात जाऊन निवडणुका लढवण्याचे नाटक करत लोकाची दिशाभूल करुन सेक्युलर मतांचे विभाजन करण्याचे काम करणारी. आप व तृणमुल दुसरी शक्ती असून हे पक्ष कॉंग्रेसची मते फोडण्याचे काम करत आहेत. मनी व मसल पावरचा वापर करुन कॉंग्रेसच्या काही नेत्यांना गळाला लावण्याचे काम हेच पक्ष करत आहेत. असा आरोप करुन अशा पक्षासोबत युती करण्यास कॉंग्रेसला स्वारस्थ नसल्याचे राव यांनी सांगितले. राज्यात कॉंग्रेसचे काम चांगले असून गेली साडेचार वर्षे लोकांच्या समस्या घेऊन कॉंग्रेसने आंदोलने केली आहेत. आणि त्यामुळे यावेळी कॉंग्रेसला संधी असल्याचा दावा राव यांनी यावेळी केला.

अनेक नेते तयार

कॉंग्रेस पक्ष तळागाळात पोचलेला पक्ष आहे. त्यामुळे या पक्षातून काही नेते स्वार्थासाठी इतर पक्षात गेले तरी त्याच्या जागी नवे नेते तयार असतात. असे स्पष्टीकरण राव यांनी आमदार आलेक्स रेजीनाल्ड यांच्या पक्षांतराच्या चर्चेच्या विषयावर बोलताना केले.

AAP-Trinamool Congress lures crores of rupees to Congress leaders
Goa Election: कुडतरी मतदारसंघात कौल कुणाच्या बाजूने?

ठळक चौकट - काम केलेल्या समविचारी पक्षासोबत युती शक्य!

गोव्यात अनेक वर्षे काम केलेल्या समविचारी पक्षासोबत कॉंग्रेस युतीची बोलणी करण्यास तयार आहे. मात्र जे पक्ष फक्त गोव्यात कॉंग्रेसची मते फोडण्यासाठी आलेत, त्यांच्यासोबत युती होणार नाही. असे स्पष्टीकरण दिनेश राव यांनी आज केले. गोवा फॉरवर्ड व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासोबत येत्या निवडणुकीसाठी कॉंग्रेस युती करणार का? असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारला असता. आपण कुठल्याह पक्षाचे नाव घेणार नाही. मात्र भाजपला रोखण्यासाठी गोव्यात अनेक वर्षे काम करणाऱ्या समविचारी पक्षासोबत युतीची बोलणी येत्या काळात नक्की करु. असे राव म्हणले.

Related Stories

No stories found.