सावंत सरकारवर ऑक्सिजन प्रकरणी  'आप’ चा पुन्‍हा हल्लाबोल 

 सावंत सरकारवर ऑक्सिजन प्रकरणी  'आप’ चा पुन्‍हा हल्लाबोल 
rahul 5.jpg

पणजी : ऑक्सिजनच्या (oxygen) कमतरतेमुळे झालेल्या मृत्यूच्या मुद्द्यावर न्यायालयीन आयोग स्थापन(Judicial Commission)करण्यास नकार दिल्याबद्दल आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्य संयोजक राहुल म्हांबरे (Rahul Mhambare) म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्राशी निगडित व्यक्तींचे मनोधैर्याचे यामुळे खच्चीकरण होईल, असे सरकारकडून उच्च न्यायालयात सांगितले जाणे धक्कादायक आहे. (AAPs attack on Sawant government again in oxygen case)

भाजप सरकार (BJP government) ऑक्सिजनच्या कमतरतेसाठी डॉक्टर आणि परिचारिका यांना जबाबदार आहेत, असा खोटा समज जनतेत निर्माण करत आहे. वास्तविकरीत्या ‘ऑक्सिजन फज्जा’ पुरवठ्यात केलेल्या गैरप्रकारांमुळे झाला होता. सर्वप्रथम सरकारने 20 टक्के पगारवाढ करण्याचे आश्वासन देऊन कोरोना योद्धांची फसवणूक केली. ऑक्सिजनअभावी जवळजवळ शंभर गोमंतकीयांचा मृत्यू ओढवल्यानंतर आता सरकार आपल्या अपयशाचे खापर कोविड योद्ध्यांवर फोडण्याचा प्रयत्न करत आहे. 

भाजपला ऑक्सिजन अभावी झालेल्या मृत्यूंच्‍या प्रकरणाचा विषय विस्मृतीत घालवू देणार नाही असे सांगून ते म्हणाले, ‘आप'चे नेते वाल्‍मिकी नाईक यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषदेत ऑक्सिजन फज्जा जनतेच्या नजरेआड करण्यासाठी भाजपच्या गाभा समितीत काय ठरले होते ते सांगून त्यांची पोलखोल केली होती. त्यांच्या राजकीय प्रयत्नांचा पर्दाफाश केला होता. मुख्यमंत्री या जबाबदारीपासून पळून जाऊ शकत नाहीत.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com