Mapusa : म्‍हापशातील बेवारस वाहने हटवली

मागील अनेक महिन्यांपासून या चारचाकी इस्पितळाच्या परिसरात पार्क करून काहींनी या वाहनतळाचा गैरफायदा घेतला होता.
Abandoned vehicles in Mapusa
Abandoned vehicles in MapusaDainik Gomantak

Mapusa : म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा इस्पितळाच्या आवारातील बेवारस स्थितीत पार्क ‘त्या’ दहा चारचाकी गाड्यांपैकी आठ वाहने संबंधित मालकांनी स्वतःहून हटवली. मात्र दोन वाहने इस्पितळाच्या तळमजल्यावर पार्किंगच्या ठिकाणी अजून ‘जैसे थे’ स्‍थितीत आहेत.

Abandoned vehicles in Mapusa
Konkan Railway : कोकण रेल्वेचे प्रदूषणमुक्त प्रवासाचे पर्व

मागील अनेक महिन्यांपासून या चारचाकी इस्पितळाच्या परिसरात पार्क करून काहींनी या वाहनतळाचा गैरफायदा घेतला होता. बुधवारी रात्री या गाड्या हटवून ही अडवलेली जागा मोकळी करण्यात आली. दरम्यान, जिल्हा इस्पितळाच्या आवारात उभ्‍या करण्‍यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहने चोरीस गेल्‍याच्‍या घटना घडल्या आहेत. शिवाय काही वाहनांचा इतर वाहनांना अडथळा ठरत होता. या पार्श्वभूमीवर पार्किंग स्थळातील वाहनांची पाहणी केली असता या बेवारस वाहनांचा प्रकार समोर आला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com