अभाविपकडून पोलिसांचा गौरव

Dainik Gomantak
शनिवार, 9 मे 2020

गोवा कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी सगळ्यात मोठी जबाबदारी पार पाडत आहे ते म्हणजे गोवा राज्याच्या सीमेवर तैनात असलेले आपले पोलिस बांधव व वैद्यकीय कर्मचारी जे गोव्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाची तपासणी करूनच त्याला गोव्यात प्रवेश देत आहेत.

पणजी

राज्यात कोरोना विषाणूने प्रवेश करू नये यासाठी अनधिकृतपणे राज्यात कोणी आरोग्य तपासणीविना घुसू नये यासाठी दक्ष असणाऱ्या पोलिसांचा गौरव अखिल भारतीय विद्यार्थी परीषेदेने केला. विविध सीमेवरील तपासणी नाक्यांवर जाऊन अभाविपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
अभाविपने पत्रकात म्हटले आहे, की गोवा राज्य कोरोनापासून मुक्त झाला आहे अशावेळी गोवा कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी सगळ्यात मोठी जबाबदारी पार पाडत आहे ते म्हणजे गोवा राज्याच्या सीमेवर तैनात असलेले आपले पोलिस बांधव व वैद्यकीय कर्मचारी जे गोव्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाची तपासणी करूनच त्याला गोव्यात प्रवेश देत आहेत. 
पोलिस कर्मचारी तसेच वैद्यकीय पथकाला स्मृतिचिन्हे देउन त्यांचा सन्मान केला तसेच त्यांच्या निरपेक्ष सेवे बद्दल अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आभार मानले. ह्या उपक्रमात पत्रादेवी, नयबाग, केरी, किरणपाणी, दोडामार्ग, पोळे, मोले या सर्व ठिकाणच्या तपासणी नाक्यांना भेट दिली गेली यावेळी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संकल्प फळदेसाई, प्रदेश सहमंत्री प्रभा नाईक, सर्वेश वेरेकर, रितेश झोरे, अवधुत कोटकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित बातम्या