साळ बंधाऱ्याच्या बाजूने फाटक बसवून 'प्रवेश बंद'

Dainik Gomantak
बुधवार, 13 मे 2020

महाराष्ट्रातून चोरट्या मार्गाने होणारी वाहतूक रोखून धरण्यासाठी साळ-इब्रामपूर येथील बंधाऱ्यावरील पदपुलावर पेडणेच्या हद्‌दीत बसवलेले लोखंडी फाटक काढून पदपूल वाहतुकीस खुला करण्यात आला असतानाच, आता साळ गावाच्या बाजूने नव्याने लोखंडी फाटक बसविण्यात आले आहे.

डिचोली

महाराष्ट्रातून चोरट्या मार्गाने होणारी वाहतूक रोखून धरण्यासाठी साळ-इब्रामपूर येथील बंधाऱ्यावरील पदपुलावर पेडणेच्या हद्‌दीत बसवलेले लोखंडी फाटक काढून पदपूल वाहतुकीस खुला करण्यात आला असतानाच, आता साळ गावाच्या बाजूने नव्याने लोखंडी फाटक बसविण्यात आले आहे. त्यामुळे या बंधाऱ्यावरुन छुप्या पध्दतीने महाराष्ट्रातून होणाऱ्या वाहतुकीला पुन्हा एकदा चाप बसला आहे. बंधाऱ्यावर ज्याठिकाणी फाटक बसविण्यात आले आहे, ती जागा डिचोली पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येत आहे. 'कोविड-19' महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून होणारी वाहतूक रोखण्यासाठी डिचोलीचे उपजिल्हाधिकारी सचिन देसाई यांच्या आदेशानंतर ही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे. काल मंगळवारी रात्री डिचोलीचे पोलिस निरीक्षक आणि साळ गावचे समाजसेवक मेघ:श्‍याम राऊत यांच्या उपस्थितीत हे लोखंडी फाटक बसविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या फाटकासाठी आलेला खर्च मेघ:श्‍याम राऊत यांनी केला आहे. आता दिवसभर या बंधाऱ्यावर पोलिसांतर्फे नाकाबंदी करण्यात येणार असून, सायंकाळी ७ वा. टाळे लावून हे फाटक बंद करण्यात येणार आहे.
एकाबाजूने गोव्याच्या सिमेलगत महाराष्ट्रात कोविडच्या संशयित रुग्णांचा आकडा वाढत असल्याने महाराष्ट्रातून होणारी वाहतूक रोखण्यासाठी हा बंधारा बंद करणे आवश्‍यक असल्याचे मत मेघ:श्‍याम राऊत यांनी अधिकाऱ्यांसमोर उपस्थित करून पदपूल वाहतुकीस खुला करण्यास आक्षेप घेतला होता.अखेर मेघश्याम राऊत यांनी ही बाब डिचोली उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर घालताच, त्यांनी साळच्या बाजूने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास मान्यता दिली. अशी माहिती श्री. राऊत यांनी दिली. लोखंडी फाटक बसवून पदपूलावरुन महाराष्ट्रातून होणाऱ्या वाहतुकीवर आता परत एकदा नियंत्रण येणार आहे.

goa goa goa

संबंधित बातम्या