Accident: चोर्ला घाटात अपघातांचे सत्र सुरुच; दोन चारचाकी धडकल्या

चोर्ला घाटात वाहतूक कोंडीवर उपाय आवश्यक
चोर्ला घाटात लागलेल्या वाहनांच्या रांगा
चोर्ला घाटात लागलेल्या वाहनांच्या रांगाDainik Gomantak

चोर्ला घाटात वारंवार वाहतुक कोंडीचे प्रकार समोर येत आहेत. अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रकमुळे घाटात कोंडी होत असल्याचे प्रकार समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर आज दिनांक 12 नोव्हेंबर रोजी दोन चारचाकीचा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

(Accident between 2 four wheelers at Chorla Ghat)

चोर्ला घाटात लागलेल्या वाहनांच्या रांगा
Goa News: नरेंद्र गावकर यांची काले सरपंचपदी बिनविरोध निवड

मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारच्या सुमारास चोर्ला घाटात दोन चारचाकी वाहनांचा अपघात झाला आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र दोन ही चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही वाहने गोव्यातून बेळगावच्या दिशेने जात असताना यांच्यात धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. मात्र अपघातील व्यक्तींची माहिती मिळू शकलेली नाही.

चोर्ला घाटात लागलेल्या वाहनांच्या रांगा
Sanjivani Sakhar: ऊस उत्पादकांचा गोवा सरकारला 24 नोव्हेंबरपर्यंत अल्टीमेटम; आंदोलनाचा इशारा

चोर्ला घाटात वाहतूक कोंडीवर उपाय आवश्यक

चोर्ला घाटात आज अपघात झाला असला तरी या घाटात वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने जाणवत असल्याचे काही वाहनचालकांनी म्हटले आहे. बऱ्याच वेळा एखादे वाहन खराब झाल्यास ते पुर्ववत होईपर्यंत सर्व वाहतूक थांबावावी लागत असल्याचं ही काही वाहनचालकांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com