गोवा- मुंबई महामार्गावर अपघात....एका महिलेचा मृत्यू....
accidet 1.jpg

गोवा- मुंबई महामार्गावर अपघात....एका महिलेचा मृत्यू....

गोवा (Goa) -मुंबई (Mumbai) महामार्गावर माणगांव शहरातील (Mangaon) बाजारपेठेतील मोतीराम प्लाझा (Motiram Plaza) समोर मुंबई गोवा हायवेवर रोड कन्स्ट्रक्शन (Road construction) चे काम करणाऱ्या क्रेन च्या टायर खाली येऊन एका पादचारी महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. (Accident on Goa Mumbai highway Death of a woman) 

ही घटना आज  घडली असुन  माणगाव मधील बामणोली रोड परिसरात राहणारी ही महिला विद्या नंदकुमार नंबियार (Vidya Nandkumar Nambiar) वय वर्षे ३८ ही महिला माणगांव हायवेवरील गोल्डन पार्क (Golden Park) या बिल्डिंग मध्ये साफसफाई चे काम करते ती सकाळी कामाकरिता पायी चालत जात असताना चेतक इंटरप्रायझेस (रोड कन्स्ट्रक्शन कंपनी)चा क्रेन माणगाव बाजूकडून इंदापूर कडे जात असताना या महिलेला मागून ठोकर देऊन फरफटत नेले.यामुळे या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com