बोरी येथे ट्रक-कारचा भीषण अपघात

अपघातात कारचालक गंभीर जखमी, गुन्हा दाखल
बोरी येथे ट्रक-कारचा भीषण अपघात
Accident in PondaDainik Gomantak

फोंडा : बोरी येथे मुख्य रस्त्यावर मंगळवारी रात्री टिप्पर ट्रक आणि कारगाडी यांच्यात अपघात झाला. यात तामसडो-धारबांदोडा येथील सागर धुमे हा कारचालक जखमी झाला. अपघातग्रस्त ट्रकचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती आहे.

ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी ट्रकचालक करबसप्पा दुंडप्पा गोनल (वय 27 ) हा दारूच्या नशेत होता हे उघड झाले आहे. करबसप्पा हा मूळचा मुद्देबिहाळ - विजापूर कर्नाटक येथील असून तो सध्या आर्लेम - मडगाव येथे राहतो. मंगळवारी रात्री बेकायदा रेती घेऊन GA-08 U-4375 या क्रमांकाच्या ट्रकने करबसप्पा मडगावच्या दिशेने जाताना समोरून येणाऱ्या GA-03 W-8350 या क्रमांकाच्या कारगाडीला ठोकर बसली.

Accident in Ponda
राहुल गांधी ED केसचे पडसाद गोव्यात; GPCC अध्यक्षांसह कार्यकर्ते ताब्यात

या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, जखमी कारचालकाला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. फोंडा पोलिसांनी बेकायदा रेती वाहतूक तसेच दारू पिऊन अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालक करबसप्पा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रात्रीच्या वेळी चोरटी रेती वाहतूक केली जात असून, या प्रकरणाचा अधिक तपास फोंडा पोलिस करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com