बाराजण-उसगावात तीन वाहनांचा विचित्र अपघात, दोघे जखमी

बाराजण - उसगाव येथे आज (शुक्रवारी) तीन वाहनांच्या अपघातात दोघेजण किरकोळ जखमी झाले.
Goa Accident News
Goa Accident NewsDainik Gomantak

फोंडा : बाराजण - उसगाव येथे आज (शुक्रवारी) तीन वाहनांच्या अपघातात दोघेजण किरकोळ जखमी झाले. हा अपघात सकाळी सव्वादहाचाच्या सुमारास घडला. कर्नाटक राज्यातील मालवाहू ट्रक तसेच गोव्यातील कारगाडीच्या अपघातात दुचाकीला ट्रक व कारगाडीची ठोकर बसण्याची शक्यता असल्याने दुचाकीचालकाने गाडी सोडून बाजूला उडी घेतल्याने तो बालंबाल बचावला, अन्यथा दुचाकीस्वाराच्या प्राणावर बेतले असले, सुदैवाने दुचाकीस्वार बचावला मात्र दुचाकीची मोठी नुकसानी झाली.

Goa Accident News
Goa Corona Update : 112 जणांना कोरोनाची लागण; एकाचा मृत्यू

फोंड्याहून उसगावच्या दिशेने भरधाव येणाऱ्या केए32 सी 9654 या क्रमांकाच्या कर्नाटक राज्यातील मालवाहू ट्रकची उसगावहून फोंड्याच्या दिशेने जाणाऱ्या जीए05 बी 789 या क्रमांकाच्या कारगाडीला बसली.

या अपघातात कारगाडीची मोठी हानी झाली आहे. यावेळी फोंड्याच्या दिशेने जाणाऱ्या जीए05 एन 3168 या क्रमांकाच्या दुचाकीला ट्रक व कारची जबरदस्त ठोकर बसण्याची शक्यता असल्याने दुचाकीचालकाने प्रसंगावधान राखून गाडी सोडली व बाजूला उडी मारली. मात्र दुचाकी कारगाडीला धडकली. या अपघातात दुचाकी व कारगाडीचे मोठे नुकसान झाले असून फोंडा पोलिसांनी पंचनामा केला.

दरम्यान, खांडेपार येथे जीए03 एच 7214 या क्रमांकाच्या कारगाडीच्या चालकाचे नियंत्रण गेल्याने कारगाडीची बाजूला असलेल्या दुकानाला बसली. वर्दळीच्या या रस्त्यावर अपघाताच्या वेळेला कुणी नसल्याने अनर्थ टळला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com