Goa Accident: साखळी येथे तीन वाहनांचा अपघात; दुचाकीवरील तिघे जखमी

कारचालकाचा डोळा लागल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला
Accident At Sankhali
Accident At Sankhali Dainik gomantak

Accident At Sankhali: राज्यात अपघातांचे सत्र सुरुच आहे. रविवारी रात्री पर्वरीत एका वॅगनर चारचाकीचा अपघात झाला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर रविवारी सकाळी  शिरोडा साखरवाळ येथे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस झाडाला जाऊन धडकली. यात 11 प्रवासी जखमी झाले.

दरम्यान रविवारी दुपारी साखळी येथे तीन वाहनांचा अपघात झाला आहे. कारने दोन वाहनांना धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात तीघे जण जखमी झाले असून जखमींना गोमेकॉत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Accident At Sankhali
Gomantak Home Ganesh Decoration Competition: अखिल गोवा पर्यावरणपूरक घरगुती गणेश सजावट स्पर्धा

याबाबत अधिक माहिती अशी की, साखळी गोकुळवाडी येथे एका कारने मालवाहू ट्रकला आणि दुचाकीला धडक दिली. कार साखळीहून डिचोलीच्या दिशेने जात होती. त्याचवेळी कारचालकाचा डोळा लागल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला.

कारने विरूद्ध दिशेने येणाऱ्या महिंद्रा जितो या मालवाहू गाडीवर धडकून मागे असलेल्या एक्टीवा दुचाकीवर धडकली. या धडकेत तीघे जण जखमी झाले. तिघे जखमी भटवाडी कुडचिरे येथील असून उपचारासाठी त्यांना बांबोळी येथे गोमेकॉ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com