Pernem Accident: पेडणे येथे महामार्गावर ट्रकने दिली दुचाकीला जोराची धडक; एक ठार

उत्तर प्रदेश येथील एकाला अटक
 accident
accident Dainik Gomantak

गोवा राज्यातील अपघातांची मालिका संपत नसून अपघाताचे सत्र सुरुच आहे. आज पेडणे महामार्गावर ट्रक आणि इलेक्ट्रॉनिक बाईक यांचा अपघात झाला असून या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

(accident on highway at Naibag Pernem between a truck and an electric bike)

 accident
Goa news: भाजप आमदार गणेश गावकर यांची प्रकृती स्थिर; खासगी दौऱ्यानिमित्त आहेत श्रीलंकेत

मिळालेल्या माहितीनुसार आज पेडणे येथे राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी चालक विजय रमाकांत गावकर वय 48 रा. सावंतवाडी हे आपल्या दुचाकीवरून जात असताना पेडणे नजीक आले असता त्यांच्या दुचाकीला ट्रकची जोराने धडक बसली. यात रमाकांत गावकर यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

 accident
Goa Water Problem: डिचोली येथे पाणीटंचाई कायम; तर मुळगावात पाण्याची नासाडी

याप्रकरणात ट्रकचालक दिपक दुबे राहणार उत्तर प्रदेश याला पेडणे पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यावेळी पोलिसांनी नागरिकांनी वाहतूक नियम पाळल्यास अपघात टाळता येतात. असे म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com