चाररस्ता ते माशे मनोहर पर्रीकर चारपदरी महामार्गावर अपघात

कार रस्ता विभाजक वरील पथदिव्यांच्या खांबाला धडकल्याने मोठा अपघात झाला.
मनोहर पर्रीकर चारपदरी महामार्गावर अपघात
मनोहर पर्रीकर चारपदरी महामार्गावर अपघातDainik Gomantak

काणकोण: चाररस्ता ते माशे मनोहर पर्रीकर चारपदरी महामार्गावर राजबाग येथे भटक्या गुराना बगल देताना काणकोण हून कारवारला जाणाऱ्या कारचा अपघात झाला. कारची रस्ता विभाजक वरील पथदिव्यांच्या खांबाला धडक बसून मोठा अपघात झाला. (Accident on the Manohar Parrikar four-lane highway)

अपघात चालक दिपेंद्र हलवार यांच्या डोक्याला काच लागून ते किरकोळ जखमी झाले आहे. हलवार व त्यांचा मित्र उत्तर रात्री तीन वाजण्याच्या सुमारास एच आर 77 ए 1788 या कारने कारवारला जात असताना भटक्या गुरांना बगल देताना कारची धडक बैलाला बसली व नंतर कार पथदिपाच्या खांबावर आदळली.

मनोहर पर्रीकर चारपदरी महामार्गावर अपघात
Goa : वास्‍कोत ‘डेंग्‍यू’ने वाढवला ताप!

या अपघाता बैल जागच्याजागी ठार झाला. धडक जोरदार असल्याने पथदिप खांब उखडला गेला. कारचा दर्शनी भागाची मोडतोड झाली आहे. आज सकाळी काणकोण पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मृत बैलाला रस्त्यावरून तातडीने हलवले. या बगल मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूकीचा ओघ असतो त्यातच चारपदरी रस्त्यावर भटक्या गुरांचे कळप रात्रीच्यावेळी ठाण मारून असतात त्यामुळे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्याच आठवड्यात याच बगल मार्गावर गालजीबाग येथे एका अवजड ट्रकने ठोकरल्याने तीन गुरे दगावली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com