मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचे सत्र सुरुच, मालवाहू ट्रक उलटला

ट्रकच्या (truck) अपघातात (accident) सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. रस्त्यावर खड्डे असल्यामुळे आणि त्यात ट्रकचे ब्रेक फेल (Break failed) झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले.
मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचे सत्र सुरुच, मालवाहू ट्रक उलटला
ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या एका बाजूला हा ट्रक उलटला.Dainik Gomantak

मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) अपघातांच्या (accident) संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना आपल्याला दिसत आहे. या महामार्गावरील अपघातांमध्ये लहान वाहनांबरोबरच मोठी वाहने यामध्ये ट्रक (Truck) देखील शिकार होताना दिसत आहे. या वाढत्या अपघातांना रस्त्याची सुरु असलेली कामे आणि त्यामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे हे कारणीभूत आहेत. या महामार्गावर रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे.

ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या एका बाजूला हा ट्रक उलटला.
Goa: आपेव्हाळ-प्रियोळ येथे कदंब बसला अपघात

आज झालेल्या या ट्रकच्या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. रस्त्यावर खड्डे असल्यामुळे आणि त्यात ट्रकचे ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे नियंत्रणा सुटले आणि रस्त्याच्या एका बाजूला हा ट्रक उलटला. ट्रक क्रमांक KA 02 9377 हा ट्रक महाराष्ट्रातून गोव्यात येत होता. रस्त्याचे काम सुरु असल्याने तेथे डायव्हर्जन करण्यात आले आहे. त्यामुळे हा अपघात झाल्याचे समजत आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com