Nagoa Accident : मुलांना शाळेत पोहोचविणाऱ्या वडिलांचा अपघाती मृत्यू; दोन मुले जखमी

नागवा येथे कारची दुचाकीला धडक, गुजरातच्या चालकावर गुन्हा
Nagoa Accident
Nagoa AccidentDainik Gomantak

राज्यात अपघातांचे सत्र सुरूच असून बेजबाबदार वाहनचालकांमुळे निष्पाप लोकांचा बळी जात आहे. शुक्रवारी नागवा येथे मुलांना शाळेत सोडण्यासाठी जाणाऱ्या वडिलांच्या दुचाकीला पर्यटक वाहनाने धडक दिली. या अपघातात पित्याचा मृत्यू झाला असून दोन मुले जखमी झाली आहेत.

Nagoa Accident
GCA Premier League: एमसीसी दणदणीत विजयासह अव्वल

या प्रकरणी हणजूण पोलिसांनी चारचाकी वाहनचालक पौषक शाह (रा. वडोदरा-गुजरात) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली.

शुक्रवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास जॉन डिसोझा (52, रा. रावतांवाडो-नागवा) नेहमीप्रमाणे आपल्या दोन मुलांना परिसरातील सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये सोडण्यासाठी ॲक्टिवा स्कुटरवरून (क्र. जीए 03 एए 8091) हडफडेंच्या दिशेने जात होते.

Nagoa Accident
CM Pramod Sawant: आगामी दोन वर्षात राजधानी पणजी सोलर सिटी बनवणार

त्यावेळी होली त्रिनिटी चर्च जवळील रस्त्यात पाठीमागून भरधाव पर्यटक गाडीने (जीए 03 डब्ल्यू 7817) त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीवरील तिघेही जोरात रस्त्यावर पडले. यावेळी जॉन यांच्या डोक्याला जबर मार बसून ते गंभीर जखमी झाले.

तर पाठीमागे बसलेल्या मुलांना मुका मार लागला. जखमी जॉनला उपचारासाठी म्हापशाच्या जिल्हा इस्पितळात रुग्णवाहिकेतून नेताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com