Gram Sabha: वार्कात सत्ताधारी-विरोधकांत आरोप-प्रत्यारोप

पंच डिकॉस्ता : पंचायत कचेरीत येण्यासही निर्बंध, सचिवांना भेटण्यास पूर्व परवानगीची अट
Gram Sabha
Gram Sabha Dainik Gomantak

वार्का ग्रामसभा सत्ताधारी व विरोधी पंचांमधील आरोप व प्रत्यारोपाने गाजली. आजच्या सभेत अनेक प्रश्र्नांवर चर्चा झाली, खरी पण प्रत्येक वेळी दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमकी झाल्या. विरोधी पंचातर्फे बोलताना शेनोन आलेमांव डिकॉस्ता यांनी सत्ताधारी पंचांवर व सचिवांवर अनेक आरोप केले.

प्रभागातील मंजूर झालेली विकास कामे होत नाहीत. पंचायत कचेरीत जाण्यास आम्हांला परवानगी घ्यावी लागते. सत्ताधारी पंचांना मात्र हा नियम लागू होत नाही. सचिव आम्हांला आपल्या केबिनमध्ये घेत नाहीत, असे अनेक आरोप डिकॉस्ता यांनी केले.

एडिसन रॉड्रिग्स व नोरा रॉड्रिग्स म्हणाले, आमच्या प्रभागातील गटाराचे काम रखडले आहे. आम्ही या संदर्भात बीडीओंना निवेदन दिले आहे. सरपंच सालिसानो फर्नांडिस व उपसरपंच रोलांड फर्नांडिस म्हणाले, विरोधक नाहक आरोप करीत आहेत. आमचा कारभार पारदर्शक आहे. वार्का पंचायत क्षेत्रातील विकास हेच ध्येय घेऊन आम्ही पुढे जात आहोत.

Gram Sabha
Goa Fire Cases : आगीचा भडका सुरूच! चिंबलमधील पेपर फॅक्टरीला भीषण आग

म्हादईप्रश्‍नी कर्नाटकचा निषेध

आजच्या ग्रामसभेत अर्थसंकल्प मांडण्यात आला. त्यात 7 कोटी 32 लाख रुपयांचा महसूल प्राप्त होईल, अशी तरतुद करण्यात आली असून विकास कामे व पंचायतीच्या खर्चानंतर पंचायतीच्या खात्यात 50 लाख रुपये शिल्लक राहणार आहेत.

शिवाय पंचायत क्षेत्रात क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी 1.50 लाख रुपयांवरून 4 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामसभेच्या शेवटी म्हादई नदीचे पाणी कर्नाटकाला वळविण्यास दिलेल्या परवानगीचा निषेध करण्यात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com