अश्‍लिल छायाचित्रे पाठविणारा गोवा क्राईम ब्रँचच्या ताब्यात

दैनिक गोमन्तक
बुधवार, 6 जानेवारी 2021

गोव्यातील एका शिक्षिकेला मोबाईलवरून अश्‍लिल व्हिडिओ कॉल्स तसेच अश्‍लिल छायाचित्रे पाठविणाऱ्या इब्राहिम अहमद खाटीक याला सांगली - मिरज येथे जाऊन गोव्याच्या सीआयडी क्राईम ब्रँचने अटक केली.

पणजी: गोव्यातील एका शिक्षिकेला मोबाईलवरून अश्‍लिल व्हिडिओ कॉल्स तसेच अश्‍लिल छायाचित्रे पाठविणाऱ्या इब्राहिम अहमद खाटीक याला सांगली - मिरज येथे जाऊन गोव्याच्या सीआयडी क्राईम ब्रँचने अटक केली. वरील घटनेसंदर्भातची तक्रार शिक्षिकेने पोलिसात दिली होती.

सायबर तंत्रज्ञानाच्या मदतीने संबंधित तरुणाचा पोलिस निरीक्षक विश्‍वेश कर्पे यांनी शोध घेतला असता तो मिरज - सांगली येथील असल्याचे उघड झाले. पोलिस उपनिरीक्षक सर्वेश सावंत यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने मिरजला जाऊन त्याच्या मुसक्या आवळल्या व गोव्यात आणले.

संबंधित बातम्या