मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर ACGL कामगारांचा संप तात्पुरता स्थगित
ACGL workers strike Called offDainik Gomantak

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर ACGL कामगारांचा संप तात्पुरता स्थगित

मंगळवार पर्यंत तोडगा काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे दिले आश्वासन

ACGL workers strike: गेल्या पाच दिवसांपासून पगार वाढीच्या मुद्द्यावरून संपावर गेलेल्या एसीजीएल (ACGL) कंपनीच्या कामगारांना मुख्यमंत्र्यांनी (CM Dr Sawant) मंगळवार पर्यंत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे, त्यामुळे कामगार संघटनेने पुकारलेला संप मागे घेऊन त्या नंतर पुढचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती आज सायंकाळी पाच दिवसांच्या संपाची सांगता करतेवेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

ACGL workers strike Called off
काणकोण येथे शाळांमध्ये मध्यान्ह आहार योजनेत मुलांना कुजके बटाटे

सदर कंपनीच्या कामगारांच्या पगार वाढीचा मुद्द्यावर कोणताच तोडगा निघाला नसल्याने सदर कामगार दि 18 रोजी पासून पाच दिवस संपावर गेले होते, त्यामुळे कंपनीचे संपुर्ण कामकाज बंद होते, या काळात कामगारांच्या वतीने वाळपई तसेच सांखळी शहरात मोर्चा काढून सरकारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता, त्याच प्रमाणे सदर संपाला राज्यातील विविध पक्षांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला होता. यांची दखल मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी घेऊन काल रात्री कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यां बरोबर बैठक घेऊन या प्रकरणी आपण मंगळवार पर्यंत कंपनीच्या व्यवस्थापनाकडे बोलणी करून तोडगा काढण्याची ग्वाही दिली आहे.

ACGL workers strike Called off
52वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 20 नोव्हेंबर रोजी

मुख्यमंत्र्यांच्या शब्दांचा मान राखून गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला संप स्थगित करीत असल्याची माहिती एसीजीएल कामगार संघटनेच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार संघटनेचे अध्यक्ष डॉ मनोज चव्हाण यांनी आज संध्याकाळी दिली. यावर कामगार संघटनेने समाधान मानून मंगळवार पर्यंत थांबण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com