मांद्रे, हरमलात अमली पदार्थविराेधी कारवाई

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020

 पोलिसांनी केलेल्या आज दोन धडक कारवाईत एकूण ३,३१००० रुपयांचा अमली पदार्थ पकडला व ओलेग नाझराव(वय३७) या रशियन नागरिकत्व असलेल्या पर्यटकाला अटक केली.  

 

 पेडणे: पोलिसांनी केलेल्या आज दोन धडक कारवाईत एकूण ३,३१००० रुपयांचा अमली पदार्थ पकडला व ओलेग नाझराव(वय३७) या रशियन नागरिकत्व असलेल्या पर्यटकाला अटक केली.  

पेडणे पोलिस ठाण्याचे निरीक्षक जीवबा दळवी यांना सावंतवाडा मांद्रे येथे एक विदेशी पर्यटक अंमली पदार्थ विकत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली त्यानुसार आपल्या नेतृत्वाखाली उपनिरिक्षक प्रफुल्ल गिरी, हरिष वायंगणकर,कॉन्स्टेबल विनोद नाईक, रवी माळोजी, अनिष पोके या पोलीस सहकाऱ्यांचे एक पथक केले.खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सावंतवाडा मांद्रे येथे तो रहात असलेल्या ठिकाणी  शोध घेतला असता त्याच्याकडे चरस व गांजा सापडला.

चरसची किंमत २५,००० रुपये तर गांजाची किंमत १ लाख ६००० रुपये एवढी आहे.संध्याकाळी उशिरापर्यंत ही कारवाई सुरु असतानाच दोन तासांच्या अंतराने मधलावाडा-हरमल येथे सर्व्हे क्रमांक १०७/८५मध्ये  पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक संजीत कांदोळकर,कॉन्स्टेबल गजा सावंत, प्रवीण महाले, सचिन गावस व शैलेंद्र पार्सेकर यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे शोध घेतला असता मोकळ्या जागेत कॅनाबीस  वनस्पतीची बेकायदेशीर लागवड केल्याचे आढळून आले.त्याची किंमत १,७५००० रुपये एवढी होती.

याप्रकरणी सदर जमिनीचा मालक आदीची चौकशी सुरु आहे.जीवबा दळवी यांनी पेडणे पोलिस ठाण्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर अंमली पदार्थविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे.

संबंधित बातम्या