वाळपईत यापुढे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई

dainik Gomantak
मंगळवार, 7 जुलै 2020

वाळपई भागात कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत ही चिंतेची बाब आहे. त्यासाठी आता वाळपईतील दुकान व्यावसायिक व नागरिक सामाजिक अंतर व अन्य नियमांचे पालन करीत नसतील, तर त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करणार आहे, अशी माहीती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी वाळपई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली

वाळपई

एखादा दुकानदार ‘कोविड - १९’विषयी खबरदारी घेत नसेल, तर त्या दुकानाचा परवाना थेट रद्द केला जाईल, अशी माहीती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी वाळपई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नगराध्यक्ष अख्तर शहा उपस्थित होते.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले, की सत्तरी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने खबरदारी म्हणून पर्ये व वाळपई मतदारसंघासाठी खास १०८ रुग्णवाहिका उपलब्ध करणार आहे. वाळपई शहरात फिरताना जे कोणी मास्क परिधान करीत नसतील, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचे आदेश संबंधित अधिकारी वर्गाला दिले आहेत. सत्तरीत रुग्ण सापडलेल्या गावात, त्या परिसरात सॅनिटायझरची फवारणी केली जाणार आहे. काही ठिकाणी केली आहे. लोकांनी मास्क परिधान करूनच गरजेनुसार घराबाहेर पडावे. लोकांचे जीवन सुरक्षित राहण्यासाठी आरोग्य खाते पाऊले उचलीत आहे. केरळमध्ये सरकारने प्लाझ्मा थेरपीव्दारे कोविडचे दहा रुग्ण बरे केले आहेत. आपण केरळच्या आरोग्यमंत्र्यांशी संपर्क केला आहे. गोव्यात प्लाझ्मा थेरपी व प्लाझ्मा बँकिंग सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. आपणाला सरकारने पेडणे, फोंडा, सत्तरी अशा तीन तालुक्यांची जबाबदारी दिली आहे.

घोडेमळ ‘कंटेन्मेंट झोन’मधून मुक्त करणार
मोर्ले येथील घोडेमळ भाग ‘कंटेन्मेंट झोन’मध्ये आहे, पण आता बारा दिवस उलटून गेले आहेत. त्यासाठी हा झोन मागे घेण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला आहे. या घोडेमळ भागातील जे लोक नोकरीसाठी खासगी कंपनीत गेले नाहीत. घरी राहिले आहेत. अशा लोकांवर कामावरून कमी करण्याची कारवाई करू नये यासाठी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून संबंधीत कंपनीला आदेश दिले जाणार आहेत, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.

Goa Goa Goa Goa Goa Goa Goa

संबंधित बातम्या