COVID-19 Goa: कोरोना रुग्णांवरील उपचारास टाळाटाळ केल्यास कारवाई

vishwajit rane
vishwajit rane

पणजी: राज्यातील खाजगी इस्पितळात कोरोना रुग्णावर (Coronavirus) उपचार करण्यासाठी 50 टक्के खाटा उपलब्ध करून देण्याची सूचना करण्यात आलेली आहे. त्यानुसार खासगी इस्पितळांमध्ये कोरोना रुग्ण दाखल केले जात आहेत. गोमंतकीयांना खासगी इस्पितळांमध्ये  दीनदयाळ सामाजिक स्वास्थ्य सेवा योजनेचा (DDSY) लाभ मिळणार आहे. मात्र खासगी रुग्णालयांनी फक्त कमी लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांनाच आपल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून न घेता कोरोनामुळे गंभीर झालेल्या रुग्णांनाही आपल्या इस्पितळांमध्ये दाखल करून घ्यावे व त्यांच्यावर योग्य ते उपचार करून त्यांना बरे करावेत. (Action to be taken if treatment on corona patients is avoided)

ज्‍या खासगी इस्पितळात गंभीर कोरोना रुग्णांना आपल्या इस्पितळांमध्ये दाखल करून घेणार नाहीत किंवा त्यांच्यावर योग्य ते उपचार करणार नाहीत. त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. जी इस्पितळे गंभीर कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी टाळाटाळ करतील त्यांच्या विरोधात संबंधित कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांनी राज्य सरकारच्या आरोग्य खात्याच्या संचालकांना किंवा आरोग्य खात्याच्या सचिवांना ई-मेल पाठवावा व आपली तक्रार नोंद करावी. जेणेकरून सरकारला सदर खासगी इस्पितळाच्या विरोधात कारवाई करणे सोपे जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे (Vishwjit Rane) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केली आहे.

काही खासगी इस्पितळे फक्त कमी लक्षणे असलेला कोरोना रुग्णांनाच दाखल करून घेत असल्याचे वृत्त सोशल मीडियावर आल्यानंतर आरोग्य मंत्र्यांनी ही माहिती प्रसारित केली आहे. सर्व प्रकारच्या कोरोना रुग्णांना खासगी इस्पितळांनी दाखल करून योग्य उपचार करून त्यांना कोरोनातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे गरज असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

नोडल अधिकाऱ्यांशी चर्चा

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आज गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. त्याच बरोबर सुपर स्पेशालिटी विभागालाही भेट देऊन तेथे कोरोना रुग्णांवर उपचार चालू आहेत, त्यांची माहिती घेतली. गोमेकॉच्या सर्व अधिकाऱ्यांची  तसेच नोडल अधिकाऱ्यांची बैठक आरोग्यमंत्री राणे यांनी घेतली व कोरोना रुग्णांवर सुरू असलेल्या उपचाराबाबत आणि गोमेकॉ तसेच सुपरस्पेशालिटी येथे  दाखल असलेल्या कोरोना रुग्णांवर सुरू असलेल्या उपचाराबाबतही अधिकाऱ्यांशी चर्चा केली. चांगल्या सुविधा उपलब्ध करून देऊन कोरोना रुग्णांना बरे करा. तसेच मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न करा, अशी सूचना आरोग्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केली. यावेळी गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर व आधिकारी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com