'एक्शन ईन गोवा' हे डॉ. लोहिया यांचे पुस्तक भावी पिढीसाठी अनुभवांचा खजिना

की नवी पिढी इतिहासावर नव्हे तर वर्तमानात जगते. त्यांना जागविण्यासाठी अशी पुस्तके महत्वाची आहेत. या पुस्तकामुळे युवकांना गोव्याच्या स्वातंत्र लढ्यातील प्रत्येक प्रमुख घटनांची माहिती मिळेल.
'एक्शन ईन गोवा' हे डॉ. लोहिया यांचे पुस्तक भावी पिढीसाठी अनुभवांचा खजिना
Dr. Lohia's book 'Action in Goa' : डॉ. राम मनोहर लोहिया यांचे एक्शन ईन गोवा या कोकणी, मराठी व हिंदी अनुवादीत पुस्तकाच्या लोकार्पण सोहळ्यात (डावीकडुन) ब्रिजेश देसाई, दामोदर घाणेकर, पराग रायकर, अन्वेषा सिंगबाळ, डॉ. सुरेश खैरनार, दामू ऩाईक, अभिषेक रंजन सिंग व परेश प्रभू. Dainik Gomantak

फातोर्डा: स्वातंत्र्य सैनिक डॉ. राम मनोहर लोहिया यांनी 1947  साली एक्शन ईन गोवा हे इंग्रजी हस्तलिखित मुंबई प्रकाशनने प्रकाशीत केले होते. पण त्याचे पुस्तकात रुपांतर करण्यासाठी 74 वर्षे लागली. अखेर 18 जुन 2021 या दिवशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते त्याचे इंग्रजीतील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. केवळ चार महिन्याच्या अवधीच या इंग्रजी पुस्तकाचे कोकणी, मराठी व हिंदी मध्ये भाषांतरीत करण्यात आले. या तिनही भाषांतरीत पुस्तकाचे लोकार्पण आज मडगावी रवींन्द्र भवनच्या सभागृहात डॉ. लोहियाच्या 54व्या पुण्यतिथी दिनी करण्यात आले.

Dr. Lohia's book 'Action in Goa' : डॉ. राम मनोहर लोहिया यांचे एक्शन ईन गोवा या कोकणी, मराठी व हिंदी अनुवादीत पुस्तकाच्या लोकार्पण सोहळ्यात (डावीकडुन) ब्रिजेश देसाई, दामोदर घाणेकर, पराग रायकर, अन्वेषा सिंगबाळ, डॉ. सुरेश खैरनार, दामू ऩाईक, अभिषेक रंजन सिंग व परेश प्रभू.
सरकार तुमच्या दारी कार्यक्रमातून मुख्यंत्र्यांची जनतेला मदत

या प्रसंगी राष्ट्रीय सेवा दलाचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार, डॉ. राम मनोहर लोहिया रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष अभिषेक रंजन सिंग,रवींन्द्र भवनचे अध्यक्ष व माजी आमदार दामू नाईक, कोकणी भाषा मंडळाच्या अध्यक्षा अन्वेषे सिंगबाळ, 18 जून क्रांतीदीन समितीचे अध्यक्ष पराग रायकर कोकणी व मराठीतुन अनुवाद केलेले अनुक्रमे दामोदर घाणेकर व परेश प्रभु हे मान्यवर उपस्थित होते. हिंदीतुन अनुवाद अमरनाथ झा यांनी केला आहे.

Dr. Lohia's book 'Action in Goa' : डॉ. राम मनोहर लोहिया यांचे एक्शन ईन गोवा या कोकणी, मराठी व हिंदी अनुवादीत पुस्तकाच्या लोकार्पण सोहळ्यात (डावीकडुन) ब्रिजेश देसाई, दामोदर घाणेकर, पराग रायकर, अन्वेषा सिंगबाळ, डॉ. सुरेश खैरनार, दामू ऩाईक, अभिषेक रंजन सिंग व परेश प्रभू.
सरकार तुमच्या दारी उपक्रमाचे गरीबांकडे दुर्लक्ष; प्रवीण आर्लेकर

एक्शन ईन गोवा हे पुस्तक भावी पिढीला मार्गदर्शक ठरणारे आहे असे सर्वच व्यक्त्यांनी सांगितले. दामू नाईक यानी सांगितले की नवी पिढी इतिहासावर नव्हे तर वर्तमानात जगते. त्यांना जागविण्यासाठी अशी पुस्तके महत्वाची आहेत. या पुस्तकामुळे युवकांना गोव्याच्या स्वातंत्र लढ्यातील प्रत्येक प्रमुख घटनांची माहिती मिळेल. देशाचे स्वातंत्र्य होऊन गोवा स्वतंत्र व्हायला 14 वर्षे का लागली हे सुद्धा लोकांना कळले पाहिजे . हे पुस्तक म्हणजे गोवा स्वातंत्र्य लढ्याचा ठेवाच आहे असे नाईक यांनी सांगितले. डॉ. लोहिया हे भारत तसेच गोवा स्वांतंत्र्य चळवळीतील हिरो आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी व्युव्हरचना केली ते पाहता त्यांना फादर ऑफ गोवा असे म्हणायला हरकत नाही असे डॉ.सुरेश खैरनार यानी सांगितले.

Dr. Lohia's book 'Action in Goa' : डॉ. राम मनोहर लोहिया यांचे एक्शन ईन गोवा या कोकणी, मराठी व हिंदी अनुवादीत पुस्तकाच्या लोकार्पण सोहळ्यात (डावीकडुन) ब्रिजेश देसाई, दामोदर घाणेकर, पराग रायकर, अन्वेषा सिंगबाळ, डॉ. सुरेश खैरनार, दामू ऩाईक, अभिषेक रंजन सिंग व परेश प्रभू.
पेडणे तालुक्यातील युवा शेतकऱ्यांचे नवनविन प्रयोग

या पुस्तकांमध्ये डॉ. लोहियाच्या निवडक आठवणी, भाषणे, त्यांचे अनुभवांचा समावेश आहे, या पुस्तकाचे भाषांतर करताना अंगावर शहारे आल्याचे दामोदर घाणेकर यांनी सांगितले. लोहिया आणि गोव्याचे नाते या बद्दलची माहिती पुस्तकात मिळते. डॉ. लोहियानी गोव्याच्या स्वातंत्र्याचा कधीही उच्चार केला नाही केवळ नागरी हक्कासाठी लढा द्या हाच त्यांचा विचार होता. गोव्याच्या मुक्तीनंतरचा विचार, गोव्याच्या आत्मनिर्भरतेचा विचार, आपले प्रश्र्न आपणच सोडवावे हे विचार त्यानी मांडले असे परेश प्रभू यानी सांगितले. हे पुस्तक संशोधक, विद्यार्थी यांना उपयुक्त ठरेल.

Dr. Lohia's book 'Action in Goa' : डॉ. राम मनोहर लोहिया यांचे एक्शन ईन गोवा या कोकणी, मराठी व हिंदी अनुवादीत पुस्तकाच्या लोकार्पण सोहळ्यात (डावीकडुन) ब्रिजेश देसाई, दामोदर घाणेकर, पराग रायकर, अन्वेषा सिंगबाळ, डॉ. सुरेश खैरनार, दामू ऩाईक, अभिषेक रंजन सिंग व परेश प्रभू.
गोव्यातील जलसफरी बोटींवर वाढतेय गर्दी

भारतीय भाषांचा प्रसार व प्रचार करणे डॉ. लोहिया यांचे स्वप्न होते. डॉ. राममनोहर लोहिया रिसर्च फाऊंडेशनतर्फे त्यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांचे साहित्य भारतीय भाषांमध्ये अनुवादीत करण्याचा उपक्रम फाऊंडेशनने हातात घेतल्याचे अध्यक्ष अभिषेक रंजन सिंग यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सांगितले. हे पुस्तक बंगाली भाषेत व आजच हैद्राबाद येथे तेलगु भाषेत प्रकाशीत करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ब्रिजेश देसाई यानी केले तर शेवटी आभार प्रदर्शन अन्वेषा सिंगबाळ यानी केले.

Related Stories

No stories found.