Traffic Rules: ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधी मोहिमेअंतर्गत 31 जणांवर वाहतूक पोलिसांची कारवाई

पोलिसांनी वाहनचालकांची अल्कोमीटरच्या सहाय्याने मद्यप्राशन केले आहे की नाही याची कडक तपासणी सुरू केली होती.
Action of traffic police against 28 people under anti-drunk and drive campaign
Action of traffic police against 28 people under anti-drunk and drive campaignDainik Gomantak

पणजी : राज्यातील अपघातांचे सत्र रोखण्यासाठी वाहतूक पोलिसही सक्रिय झाले आहेत. ड्रंक अँड ड्राईव्ह विशेष मोहिमेच्या पहिल्या दिवशी गोवा पोलिसांनी मद्यपान करून वाहन चालवण्याच्या 31 केसेस दाखल केल्या आहेत. मंगळवारी रात्री राज्यात दोन्ही जिल्ह्यातील पोलिसांनी वाहनचालकांची अल्कोमीटरच्या सहाय्याने मद्यप्राशन केले आहे की नाही याची कडक तपासणी सुरू केली होती.
(Action of traffic police against 31 people under anti-drunk and drive campaign)

Action of traffic police against 28 people under anti-drunk and drive campaign
Goa Police : पोलिस रेकॉर्डस् होणार डिजिटलाईज्ड

ड्रंक अँड ड्राईव्ह विरोधी मोहिमेअंतर्गत 28 जणांवर वाहतूक पोलिसांची कारवाई

  • पणजी 8

  • महापसा 4

  • कळंगुट 1

  • हणजुण 1

  • फोंडा 5

  • मडगाव 3

  • वास्को 1

  • कोलवा 2

  • काणकोण 2

  • केपे 1

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्याभरात झालेल्या अपघातांमध्ये वाहनचालकांनी मद्यप्राशन केल्याची शंका आहे. त्या अनुषंगाने ही मोहीम सक्रियपणे राबवली जात आहे.

Action of traffic police against 28 people under anti-drunk and drive campaign
Goa Monsoon: राज्यात 5 आणि 6 ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट जारी

गोवा पोलिसांनी काल रात्रीपासून दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी पोलिसांनी जवळपास 31 गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती Dy SP वाहतूक धर्मेश आंगले यांनी दिली. नवीन मोटार वाहन कायद्यानुसार मद्यपान करून वाहन चालवल्याच्या गुन्ह्यासाठी 10,000 रुपये दंड आणि/किंवा 6 महिने तुरुंगवासाची तरतूद आहे. पणजीमध्ये सर्वाधिक म्हणजे 8 प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत, त्यानंतर फोंडा आणि म्हापसा येथे अनुक्रमे 5 आणि 4 प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com