Single-use Plastic Ban: सिंगल युज प्लास्टिक विक्री आणि वापरावर पणजी पालिकेचा कारवाईचा बडगा

सिंगल युज प्लास्टिकची विक्री किंवा वापर करणाऱ्या दुकाने आणि आस्थापनांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय पणजी पालिकेने घेतला आहे.
Single-use Plastic Ban
Single-use Plastic BanDainik Gomantak

गोव्याच्या भवितव्याच्या दृष्टीने पणजी पालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. सिंगल युज प्लास्टिकची विक्री किंवा वापर करणाऱ्या दुकाने आणि आस्थापनांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय पणजी पालिकेने घेतला आहे. सिंगल युज प्लास्टिकचा वापर करणारी दुकाने, हॉटेल्स, अन्य विक्रेते हे लक्ष केले जाणार आहे.

प्लॅस्टिकच्या पिशव्यांव्यतिरिक्त, एकेरी वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकच्या वस्तू जसे की प्लॅस्टिक कप, चमचे, इअरबड्स, पॅकेजिंग, दुधाचे पॅकेट आणि प्लास्टिकचे रॅपर इतर राज्यांतील उत्पादकांकडून मागवून सध्या गोव्यात विकले जाताहेत

जेव्हा 1 जुलै रोजी सर्वत्र सिंगल युज प्लास्टिकवर बंदी लागू करण्यात आली. तेव्हा सीसीपीने जागरुकता कार्यक्रम, प्लास्टिकला पर्याय यावर लक्ष केंद्रित केले आणि व्यावसायिक आस्थापनांना बदलण्यासाठी वेळ दिला होता. कापडी पिशव्या आणि बायो-डिग्रेडेबल बॅग वापरास प्रोत्साहन देणे हे देखील CCP चे उद्दिष्ट आहे.

Single-use Plastic Ban
Goa Crime : गेल्या तीन दिवसांत 48 चोरट्यांना अटक

"या वर्षापासून सिंगल युज प्लास्टिकची विक्री किंवा वापर करणाऱ्यांवर जप्ती आणि दंड आकारण्यासाठी एक टीम तयार केली जाईल," असे CCP अधिकाऱ्याने सांगितले. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने जारी केलेल्या केंद्रीय अधिसूचनेनुसार 31 डिसेंबरनंतर, केवळ 120-मायक्रॉन जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांना परवानगी आहे.

Single-use Plastic Ban
Purple Fest: पर्पल फेस्टच्या अडचणीत वाढ, एजन्सीच्या निवड प्रक्रियेला काँग्रेसचा आक्षेप

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने 2021 मध्ये एक अधिसूचना जारी केली होती, ज्यात सिंगल युज प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी घालण्याची प्रक्रिया सुरू केली होती. 30 सप्टेंबर 2021 पासून 75 मायक्रॉनपेक्षा कमी आकाराच्या पिशव्यांवर बंदी घालण्यात आली होती, तर 1 जुलैपासून इतर सर्व एकेरी वापरल्या जाणार्‍या प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घातली जाईल असे म्हटले होते. गोव्यात सुमारे 13-14 प्लास्टिक उत्पादक आहेत ज्यांनी त्यांची उत्पादन प्रक्रिया आधीच जास्त मायक्रॉन जाडी असलेल्या प्लास्टिककडे वळवली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com