Illegal Massage Parlour: 2017 पासून 21 अवैध मसाज पार्लर, स्पा सेंटरवर कारवाई - प्रमोद सावंत

कर्तव्यात कुचराई किंवा निष्काळजीपणा केल्याबद्दल कोणत्याही अधिका-यावर कारवाई नाही
 Illegal Massage Parlour
Illegal Massage ParlourDainik Gomantak

पणजी: दक्षिण आणि उत्तर गोव्यातील मिळून एकूण 21 अवैध मसाज पार्लर, स्पा सेंटरवरती (Illegal Massage Parlour) 2017 पासून कारवाई करण्यात आली आहे. तसेच, अवैध मसाज पार्लर कारवाईत निष्काळजीपणा केल्याप्रकरणी कोणत्याही अधिका-यावर कारवाई केली नाही. याप्रकरणी संबधित विभागाकडून कोणतीही तक्रार प्राप्त झाली नाही. अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी विधानसभेत दिली.

कनकोलिमचे आमदार युरी आलेमाओ (Cuncolim MLA Yuri Alemao) यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्री सावंत यांनी विधानसभेत उत्तर दिले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, '2017 पासून एकूण 21 अवैध मसाज पार्लर, स्पा सेंटरवरती कारवाई करण्यात आली आहे. दक्षिण गोव्यातील 9 आणि उत्तर गोव्यातील 12 पार्लर/ स्पा वरती कारवाई केली आहे. यामध्ये पर्वरी, अंजुना, कांदोली, सिक्वेरी, कारमोना, वार्का, कॅव्हेलोसिम, मँडरेम याठिकाणांचा समावेश आहे.'

 Illegal Massage Parlour
OBC Reservation : ओबीसी आरक्षण याचिकेवर आज सुनावणी

अवैध मसाज पार्लर, स्पा सेंटरवरती निरिक्षणासाठी काय उपाययोजना केली आहे. याप्रश्नाला उत्तर देतना सावंत म्हणाले, 'दक्षिण आणि उत्तर गोव्यात (South and North Goa) यांनी पथक तयार केले आहे. जे पथक त्यांच्या अधिकार क्षेत्रातील अवैध पद्धतीने सुरू असलेल्या मसाज पार्लर, स्पा सेंटरवरती लक्ष ठेवतील.'

 Illegal Massage Parlour
OBC Reservation : अधिवेशनात ‘ओबीसी’ आरक्षणावरुन सरकारची कोंडी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com