NCB Crackdown: अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई, रशियन महिला व ब्रिटिश नागरिकाला अटक

शिवोली अन् म्हापसा येथे पोलिसांनी केली कारवाई
NCB Crackdown
NCB CrackdownDainik Gomatak

गेल्या काही दिवसांपासून गोवा राज्यात अमली पदार्थाविरोधातील कारवाईचा वेग काहीसा कमी झाला असला तरी, आज गोवा पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई केली. या कारवाईत शिवोली अन् म्हापसा येथील दोन विदेशी नागरिकांना अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे.

(Actions taken at Siolim and Mapusa seized drugs worth four and a half lakh from foreign nationals)

NCB Crackdown
Rajesh Pednekar IFFI 2022: ‘वाघ्रो’नंतर आता आणखी एक मोहेंजोदडो' - राजेश पेडणेकर

मिळालेल्या माहितीनुसार शिवोली येथे एक महिला अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरुन अमली पदार्थविरोधी पथकाने सापळा लावत अंबिका नावाच्या रशियन महिलेला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी संशयित महिलेकडून 20.56 ग्रॅम वजनाच्या 50 गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

NCB Crackdown
Goa News: 'समुद्री परिसंस्थेसाठी रांजा मासा महत्त्वाचा' - आदित्य काकोडकर

या चौकशीत आणखी एका ब्रिटिश नागरिकाचे नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यानुसार म्हापसा येथील जेसन ली यांच्या घराची तपासणी केली. यावेळी तपासात आणखी अमलीपदार्थ मिळाले आहेत. प्राथमिक तपासात जेसन ली ही व्यक्ती रशियन महिलेला अमली पदार्थांचा पुरवठा करत असल्याचे समोर आले आहे.

कारवाईदरम्यान जेसन ली याच्याकडून पोलिसांनी सुमारे 4,50,430 रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. तसेच तो गोव्यातील अमली पदार्थ विक्री करणारा मुख्य सुत्रधार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असून अमली पदार्थविक्री करणारी साखळी आहे का ? याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com