Goa Forward: सामाजिक कार्यकर्ते फ्रेडी ट्रावासो यांचा गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश

गोवा फॉरवर्ड भाजप विरोधात आपली लढाई सुरूच ठेवेल
Fredy Travasso Joins Goa Forward Party
Fredy Travasso Joins Goa Forward PartyDainik Gomantak

Fredy Travasso Joins Goa Forward Party: सामाजिक कार्यकर्ते फ्रेडी ट्रावासो (Fredy Travasso) यांनी गोवा फॉरवर्ड (Goa Forward) पक्षात प्रवेश केला आहे. पक्षाचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई यांनी फ्रेडी यांचे पक्षात स्वागत केले. लोकशाही धोक्यात असून गोवा फॉरवर्ड भाजप विरोधात आपली लढाई सुरूच ठेवेल. विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी मी पक्षात प्रवेश केला आहे. अशी प्रतिक्रिया फ्रेडी ट्रावासो यांनी यावेळी दिली.

(Prominent Activist Fredy Travasso Joins Goa Forward Party)

यावेळी विजय सरदेसाई यांनी प्रसारमध्यांशी संवाद साधला. भाजप सरकार लोकशाहीची हत्या करण्याचे काम करत आहे. भाजप सरकार विरोधात लढणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो, आणि ते आम्ही कायम करत राहू. असे विजय सरदेसाई (Vijay Sardesai) म्हणाले.

Fredy Travasso Joins Goa Forward Party
Govt servants: बार्देश, सासष्टीत सर्वाधिक 'सरकारी बाबू', लोकसंख्येच्या तुलनेत सत्तरी अव्वल

तसेच, सरदेसाई यांनी नुकत्याच पार पडलेल्या मडगाव नगराध्यक्ष (Margao Mayor) निवडीबाबत देखील प्रश्न उपस्थित केले. कायदे बदलून पक्ष ठरवणार्‍या व्यक्तीला नगराध्यक्ष केले जात आहे, पालिका मंडळाकडून हा हक्क काढून घेतला जात आहे. हेच यापुढे पंचायतीतही होईल. मडगाव नगराध्यक्ष निवडणूक झाली तरी अध्यादेशाविरोधात न्यायालयात जाणार. असे यावेळी विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com