Adarsh Gram Yojana: आदर्श ग्राम योजनेंतर्गत वेळ्ळी गावाचा विकास होणार!

आदर्श ग्राम योजने अंतर्गत वेळ्ळी गावात विविध उपक्रमांचे आयोजन..
Vinay Dinu Tendulkar
Vinay Dinu TendulkarDainik gomantak

Adarsh Gram Yojana: केंद्र सरकारने प्रत्येक खासदाराला आदर्श ग्राम योजनेेंतर्गत प्रत्येकी एका गावाचा विकास करण्याचे आवाहन केले आहे. त्याप्रमाणे गोव्याचे राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर (Rajya Sabha MP Vinay Tendulkar) यांनी वेळ्ळी गावाला प्राधान्य दिले आहे. काल मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत तेंडुलकर यांनी ही माहिती दिली.

वेळ्ळी गावाच्या विकासाचा आराखडा भाजपचे गोव्याचे प्रवक्ते सावियो रॉड्रिग्स तयार करणार आहेत. शिवाय सरकारतर्फे नोडल अधिकारी म्हणून सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती खासदार विनय तेंडुलकर यांनी दिली.

Vinay Dinu Tendulkar
Inferior food बनवणारी आस्थापने रडारवर; मडगावात FDAचे छापे

स्टार्ट अप, क्रीडा, शाश्र्वत उद्योग या क्षेत्रांतही गावाचा विकास कसा करता येईल, त्यावर अभ्यास करून काम सुरू करण्यात येईल, असेही रॉड्रिग्स यांनी सांगितले. वेळ्ळी गावात पाण्याच्या प्रवाहाची केंद्रे आहेत. ती स्वच्छ ठेवण्याचा, कचऱ्याची समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. शिवाय विजेवर चालणारी 20 वाहने प्रथम विकत घेतली जातील व त्यांचा पर्यटकांसाठी उपयोग केला जाईल, असेही रॉड्रिग्स यांनी सांगितले.

Vinay Dinu Tendulkar
Bank Robbery : केरी बँक दरोडा प्रकरणातील चौथ्या आरोपीला पुण्यातून अटक

वेळ्ळी गावाचा विकास पर्यावरणपूरक तसेच शिक्षण, उद्योजकता, रोजगार, व्यवसाय, शेती या क्षेत्रांचे महत्त्व लक्षात घेऊन केला जाईल. सध्या एक-दोन उद्योग सुरू करण्यात आले आहेत. या दोन उद्योगांमुळे त्यांत गुंतलेल्यांना प्रतिदिन कमीत कमी 500 रुपये मिळकत होते. - सावियो रॉड्रिग्स

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com