Pramod Sawant: अधीर रंजन चौधरी आणि काँग्रेसने देशाची माफी मागावी - मुख्यमंत्री

Pramod Sawant
Pramod SawantDainik Gomantak

काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या विषयी अक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यानंतर देशात अधीर रंजन चौधरी (Adhiranjan Chaudhary) आणि काँग्रेस (Congress) विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील चौधरी यांच्या अक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करत, अधीर रंजन चौधरी आणि काँग्रेसने देशाची माफी मागावी अशी मागणी केली.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, 'काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याचा मी निषेध करतो. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा एक आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्च पदावर पोहचली आहे. या पदाचा सर्वांनी आदर केला पाहिजे. चौधरी यांचे वक्तव्य निंदनीय आहे, त्यांचा मी धिक्कार करतो. अधीर रंजन चौधरी आणि काँग्रेसने देशाची माफी मागावी,' अशी मागणी सावंत यांनी केली.

Pramod Sawant
Sangolda : सांगोल्डा रेस्टॉरंटमधील धांगडधिंगाणा पोलिसांना भोवला

नेमकं प्रकरण काय आहे?

कॉंग्रेसचे खासदार जेष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख राष्ट्रपत्नी असा केला. यावरून गुरूवारी सत्ताधारी भजापने हा मुद्दा उचलून धरला व संसदेत मोठा गदारोळ सुरू झाला. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) एकमेकांसमोर आल्याचे पहायला मिळाले.

दरम्यान, अधीर रंजन चौधरी यांनी आपलं हिंदी चांगलं नसल्याचे सांगत आपण माफी मागितली आहे. तसेच, राष्ट्रपती मुर्मू यांची प्रत्यक्ष भेट घेऊन देखील माफी मागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Pramod Sawant
Ethanol : इथेनॉलच भविष्यातील इंधनाची आत्मनिर्भरता

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com