Goa Congress : प्रशासन तुमच्‍या दारी हा ‘निवडणूक जुमला’ : काँग्रेस

म्हादई प्रकरणावर सरकार अपयशी ठरले आहे
Vijay Bhike
Vijay BhikeDainik Gomantak

‘प्रशासन तुमच्या दारी’ हा उपक्रम म्‍हणजे भाजप सरकारचा निवडणुकीच्या काळातील वास्तव झाकण्याचा आणि जनतेचे ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न आहे. हा सर्व प्रकार ‘निवडणूक जुमला प्रशासन दरबार’ असल्याची खरमरीत टीका काँग्रेसचे उत्तर गोवा माजी जिल्हाध्यक्ष विजय भिके यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केली.

राज्यातील जनेतला मोफत तीन गॅस सिलिंडर आणि पेन्शनर वैद्यकीय विमा योजना, लाडली लक्ष्मी, वीज दरवाढ, पाण्याचा तुटवडा, रस्तेअपघात, ड्रग्‍जमाफिया, आगमाफिया आदी योजनांसारखी आश्वासने भाजपने निवडणुकीपूर्वी का दिली होती, हे जनेतेने लक्षात घ्यायला हवे होते.

Vijay Bhike
Nagoa Accident: दुर्दैवी ! मुलांना शाळेत सोडायला जाताना अपघात; पित्याचा मृत्यू, मुले जखमी

भाजपने या आश्वासनांची अंमलबजावणी केली नाही. पेट्रोल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. म्हादई प्रकरणावर सरकार अपयशी ठरले आहे. आपल्या निराशाजनक कामगिरीचे अभिनंदन करण्यासाठी स्वयंप्रचार करणारा हा ‘जुमला दरबार'' आयोजित करून जनतेला ते मूर्ख बनवू शकत नाहीत.

आता जनतेला उत्तरे हवी आहेत आणि त्यांना ती द्यावी लागतील, असेही भिके यांनी ठासून सांगितले. आमदारांच्या दोन दिवसीय प्रशिक्षण सत्रावर सरकारने करदात्यांचे 25 लाख रुपये खर्च केले. परंतु पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्‍या या प्रशिक्षणावरील खर्च दुप्पट असल्याचा आरोपही भिके यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com