‘किशोर’वयीन मुले ठरताहेत अन्‍यायाचे बळी

Dainik Gomantak
मंगळवार, 30 जून 2020

लहान वयातील मुले नातेसंबंधात अडकत असल्‍याचेही आमच्‍या लक्षात आले. मागील वर्षी बालवयात गर्भधारणा झालेल्‍या मुलींचा आकडा मोठा होता. त्‍यानंतर ही गोष्‍ट लक्षात येताच आम्‍ही शाळांमध्‍ये आणि ठिकठिकाणी जाऊन या मुलांसाठी जनजागृती अभियान उपक्रम आयोजित केली.

पणजी :

गोवा पोलिसांच्या पीडित सहाय्य युनिटने (व्हीएयू) सरकारला सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, ज्‍या लहान मुलांवर विविध प्रकारे अन्‍याय होतो, त्‍या मुलांचा वयोगट ११ ते १५ वर्षे असा आहे. जेव्‍हा अपहरणासारख्या घटनांचा अभ्‍यास केला जातो तेव्‍हा यासारख्‍या अन्‍यायांना बळी पडणारा वयोगट हाच असल्‍याचे समोर येत असल्‍याची माहिती ‘व्हीएयू’ समन्वयक एमिदियो पिन्हो यांनी दिली.
लहान वयातील मुले नातेसंबंधात अडकत असल्‍याचेही आमच्‍या लक्षात आले. मागील वर्षी बालवयात गर्भधारणा झालेल्‍या मुलींचा आकडा मोठा होता. त्‍यानंतर ही गोष्‍ट लक्षात येताच आम्‍ही शाळांमध्‍ये आणि ठिकठिकाणी जाऊन या मुलांसाठी जनजागृती अभियान उपक्रम आयोजित केली. ज्‍यामुळे विद्यार्थ्यांना अनेक गोष्‍टींची माहिती झाली. गावागावात जर बाल हक्‍क समिती स्‍थापन झाल्‍या तर लहान मुलांवर होणारे अन्‍याय कमी होण्‍याची शक्‍यता असल्‍याची माहितीही पिन्‍हो यांनी यावेळी दिली.
तसेच लहान मुलांच्‍या संपर्कात असणाऱ्या प्रत्‍येकाचे पोलिसांकडून ओळख पडताळणी होणे अत्‍यंत आवश्‍‍यक आहे. यामुळे मुलांच्‍या संपर्कात असणाऱ्यांची माहिती पोलिसांकडे राहिल. तसेच लहान मुलांसोबत काम करणाऱ्या लोकांबाबत सर्वेक्षणही करणे आवश्‍‍यक असल्‍याचे पिन्‍हो म्‍हणाले. महिला व बालविकास विभागातर्फे २०१४ साली ‘व्हीएयू’ स्थापन करण्यात आले असून लहान मुलांच्‍या हक्‍कासाठी ते चांगल्‍या पातळीवर कार्यरत असतात.

संबंधित बातम्या