Goa News : खाद्यतेलाच्या भेसळीवर पाळत

अन्न आणि औषध प्रशासन संचालनालयाने गोव्यात 1 ऑगस्ट रोजी सुरू केलेल्या खाद्यतेलाच्या भेसळीवरील निगराणी मोहिमेचा एक भाग म्हणून अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी काल 2 रोजी डिचोली आणि केपे तालुक्यांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या तेलांचे 12 नमुने घेतले आहेत.
adulteration of edible oil
adulteration of edible oilDainik Gomantak

पणजी : अन्न आणि औषध प्रशासन संचालनालयाने गोव्यात 1 ऑगस्ट रोजी सुरू केलेल्या खाद्यतेलाच्या भेसळीवरील निगराणी मोहिमेचा एक भाग म्हणून अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी काल 2 रोजी डिचोली आणि केपे तालुक्यांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या तेलांचे 12 नमुने घेतले आहेत.

त्यात रिफाईंड सूर्यफूल तेल, पामोलिन तेल, कच्ची गणी शुद्ध मोहरी तेल, रिफाईंड सोयाबीन तेल, भुईमूगाचे तेल, रिफाईंड राईस ब्रान ऑईल, किरकोळ बाजारातील विविध ब्रँडच्या तेलाचा समावेश आहे.

adulteration of edible oil
Sudin Dhavalikar : राज्यातील निकृष्ट रस्त्यांसाठी माजी साबांखा मंत्री जबाबदार

दरम्यान, मडगाव येथील आके परिसरात चिकनगुनियाचे रुग्ण वाढत आहेत. तर उत्तर गोव्यात कळंगुट परिसरात डेंग्यूची लागण वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

मडगाव नगरपालिका क्षेत्रातील प्रमुख लोकवस्ती असलेल्या मालभाट व पाजीफोंड या ठिकाणी चिकनगुनिया व डेंग्यूच्‍या रुग्णांचे प्रमाण आटोक्यात येत असले तरी आके परिसरात चिकुनगुनियाचा फैलाव जोरात होत असल्‍यामुळे भीती व्‍यक्त करण्‍यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com