‘सरस्वती ज्ञानप्रसारक’च्या अध्यक्षपदी ॲड. रामनाथकर

प्रतिनिधी
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

२०२० ते २०२३ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली. या नूतन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी ॲड. संतोष रामनाथकर यांची फेरनिवड झाली.

सावईवेरे: कवळे येथील श्री सरस्वती ज्ञान प्रसारक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली.

 या सभेत २०२० ते २०२३ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली. या नूतन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी ॲड. संतोष रामनाथकर यांची फेरनिवड झाली.

इतर समिती पुढीलप्रमाणे - उदय कवळेकर (उपाध्यक्ष, जयंत कवळेकर (सचिव), शशिकांत नाईक (सहसचिव), सुधाकर नागेशकर (खजिनदार) तर सदस्य म्हणून सचिन रामनाथकर, राजेश कवळेकर, रामराव नागेशकर व राजनीश कपिलेश्र्वरकर यांची निवड करण्यात आली. यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

संबंधित बातम्या