Goa Corona Update : वर्षानंतर कोरोनाचा पहिला बळी; धास्ती वाढली

24 तासांत 108 नव्या रुग्णांची नोंद; एकूण सक्रिय बाधितांची संख्या 453
Goa Corona Updates
Goa Corona Updates Dainik Gomantak

गेल्या आठवड्यापासून देशासह राज्यातही कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. राज्यात आज सुमारे एका वर्षानंतर कोरोनाचा बळी गेला. ही धक्कादायक माहिती गोमेकॉ इस्पितळातून उघड झाल्याने राज्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली आहे.

सार्वजनिक ठिकाणी कोरोनाविषयक नियम पाळावेत, असे आवाहन करूनही लोक त्याबाबत गंभीर नाहीत. मात्र, या घटनेनंतर लोकांनी सतर्क राहणे अनिवार्य आहे.

आरोग्य खात्याने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत 108 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 453 वर पोहचली आहे. बाधितांचे हे प्रमाण 10 टक्क्यांवर पोहचले आहे.

Goa Corona Updates
Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबरअखेरीस पूर्ण

गुरुवारी 959 चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 108 बाधित आढळले. त्यातील 101 जणांनी अलगीकरणात राहणे पसंत केले आहे, तर 7 जणांची लक्षणे गंभीर असल्याने त्यांना गोमेकॉत विशेष वॉर्डमध्ये दाखल केले आहे. गोमेकॉत दाखल झालेल्या रुग्णांपैकी तिघांना उपचारानंतर घरी पाठवले, तर 16 रुग्ण बरे झाले आहेत. आज एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर राज्यातील एकूण बळींची संख्या 1014 वर पोहचली. राज्यात आतापर्यंत 2,59,813 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.

लसीकरणासाठी डोस अनुपलब्ध

  • 959 गुरुवारी केलेल्या चाचण्या

  • 108 गुरुवारी मिळालेले बाधित रुग्ण

  • 453 राज्यातील एकूण सक्रिय रुग्ण

  • 101 विलगीकरणात

  • 7 जणांवर उपचार

  • 1014 राज्यातील एकूण बळी

  • 2,59,813 आतापर्यंतचे एकूण रुग्ण

  • 2,55,346 बरे झालेल्या रुग्णांची संख्या

Goa Corona Updates
Morjim Crime : विदेशी महिलेचा विनयभंग; खुनाचा प्रयत्न

...ही आहेत कोरोनाची लक्षणे

कोरोनाची लक्षणे ही पूर्वीसारखीच आहेत. सर्दी, खोकला, ताप ही मुख्य लक्षणे आहेत. ही लक्षणे प्रतिकारशक्ती कमी असलेली लहान मुले किंवा आजारी वृद्धांमध्ये दिसतात. घरातच उपचार न घेता त्यांची जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा इस्पितळात कोरोना चाचणी (अँटीजन किंवा आरटीपीसीआर) करावी. त्यामुळे संसर्गाचा धोका टळू शकतो.

कोरोनाची लक्षणे व मार्गदर्शक तत्त्वांची माहिती आरोग्य खात्याच्या संकेतस्थळावर आहे. शिवाय आरोग्य खात्यामार्फत जनजागृती केली जात आहे, अशी माहिती आरोग्य संचालक गीता काकोडकर यांनी दिली.

‘त्याने’ केली नव्हती चाचणी

एका वर्षानंतर राज्यात गुरुवारी एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. हा रुग्ण ५२ वर्षांचा होता. काही दिवसांपासून सर्दी, खोकला, ताप येत असल्याने त्याने ठराविक औषधे घेतली होती. मात्र, त्याने कोरोनाचाचणी केली नव्हती. गोमेकॉत उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

गुरुवारी मृत्यू झालेल्या रुग्णाचा कोणत्या व्हेरिएंटमुळे मृत्यू झाला, याचा शोध घेण्यासाठी ‘आरटीपीसीआर’ चाचणी सक्तीची आहे. त्या चाचणीला वेळ लागतो. या चाचणीतूनच व्हेरिएंटची माहिती मिळू शकते. राज्यात चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बाधितांचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे.

- डॉ. प्रशांत सूर्यवंशी, साथरोग विभागप्रमुख.

..तर चौथ्या डोसची गरज नाही

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चमधील एपिडेमियोलॉजी आणि संसर्गजन्य रोगांचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी एका अहवालात सांगितले की, जर कोरोनाचे तीन डोस घेतले असतील, तर चौथ्या डोसची गरज नाही. अशा लोकांची टी सेलप्रणाली मजबूत असते. त्यामुळे कोरोनाचा धोका बराच कमी होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com