मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे गोव्यात दाखल, म्हणाले...

Eknath Shinde in Goa : बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण घेऊन आम्ही काम करत आहोत. म्हणून अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आम्ही करत राहणार आहोत. त्यामुळे आम्ही शिवसेना म्हणूनच विधीमंडळामध्ये काम करणार आहोत, असे ते म्हणाले.
Eknath Shinde in Goa
Eknath Shinde in GoaDainik Gomantak

Eknath Shinde in Goa : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या घडामोडीनंतर अखेर काल संध्याकाळी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे हे गोव्यात दाखल झाले आहेत. दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपले महाराष्ट्राबद्दलचे भविष्यातील धोरण स्पष्ट केले.

ते म्हणाले की, माझ्यासोबत असलेले 50 आमदार यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो मी सार्थकी लावण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. त्यांच्या मतदारसंघांमधील प्रलंबित प्रश्न आणि मतदारांना अपेक्षित असणाऱ्या गोष्टी पूर्ण करण्याकडे माझे आणि सरकारचे लक्ष असेल. गेल्या अडीच वर्षांच्या कारभारामध्ये ज्या गोष्टी घडल्या तर पुन्हा घडू नयेत यासाठी मी प्रयत्नशील राहीन. यादरम्यानच्या प्रत्येक घडलेल्या गोष्टीची नोंद माझ्याजवळ असून आता तशा गोष्टी आमदारांसोबत आणि मतदारांसोबत घडणार नाहीत, त्यांची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी मी सदैव प्रयत्नशील असेन. (Eknath Shinde in Goa)

Eknath Shinde in Goa
चिखली इस्पितळात ऑपरेशन थिएटर

बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण घेऊन आम्ही काम करत आहोत. म्हणून अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आम्ही करत राहणार आहोत. त्यामुळे आम्ही शिवसेना म्हणूनच विधीमंडळामध्ये काम करणार आहोत. राज्याला सर्वांगीण विकासाकडे नेण्यासाठी, राज्यामध्ये सुरू असलेले प्रकल्प निर्धारित वेळेमध्ये पूर्ण करण्यासाठी आणि सामान्य जनतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

पत्रकारांनी बहुमत चाचणीबद्दल विचारलं असता शिंदे म्हणाले की, बहुमत चाचणी ही आता फक्त एक औपचारिकता राहिली आहे. आमच्यासोबत असलेले 50 आमदार आणि भाजपचे 115 ते 120 मिळून एकूण 175 आमदार आमच्याजवळ असल्यामुळे आता चित्र स्पष्ट झाले आहेत्यामुळे बहुमत चाचणी ही एक औपचारिकता राहिली आहे.

सामान्य कार्यकर्ता ते मुख्यमंत्री

खरंतर हा विजय फक्त माझा नसून माझ्यासोबत असलेल्या 50 आमदारांचा आहे. त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्यामुळेच आम्ही या सगळ्याला वाचा फोडू शकलो. त्याचबरोबर भाजपने सुद्धा आम्हाला मोठ्या प्रमाणात समर्थन दिले. त्यासाठी मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्याचबरोबर अमित शहा आणि मुख्यकरून देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. कारण भाजपकडे आमदारांचे संख्याबळ असूनही त्यांनी आम्हाला समर्थन देत बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्यासाठी पाठिंबा दिला. म्हणूनच मी तुम्ही हा टप्पा गाठू शकलो, असे मत यावेळी शिंदे यांनी व्यक्त केले.

आमदारांचा पाठिंबा लाखमोलाचा

राजकारणातील कोणतीही व्यक्ती खरे तर सत्तेकडे जाण्यासाठी प्रयत्न करत असते. पण माझ्यासोबत असलेल्या 50 आमदारांनी त्यांच्या मतदारसंघांमधील समस्यांना वाचा मला पाठिंबा दिला आणि ते स्वतः सत्तेसोबत सत्तेपासून दूर झाले. ज्यामध्ये मी देखील येतो. त्यामुळे त्यांचा पाठिंबा नक्कीच लाखमोलाचा ठरला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com