कर्मचारी भरतीचा आदेश मागे! काँग्रेसच्या आरोपानंतर गोवा सरकारला आली जाग

या आदेशामुळे सध्या नोकर भरती प्रक्रियेत सामील झालेल्या उमेदवारांमध्ये गोंधळ उडाला होता.
कर्मचारी भरतीचा आदेश मागे! काँग्रेसच्या आरोपानंतर गोवा सरकारला आली जाग
After Congress allegations Goa government withdrew recruitment orderDainik Gomantak

पणजी: सरकारी खात्यात तसेच स्वराज्य स्थानिक संस्था व महामंडळातील रिक्त पदांवर ‘क’ व ‘ड’ वर्गातील कर्मचाऱ्यांची भरती मनुष्यबळ विकास महामंडळामार्फत केली जाईल, असा सरकारतर्फे काढलेला आदेश मागे घेण्यात आला. या आदेशामुळे विविध खात्यात सध्या सुरू असलेल्या नोकर भरतीसंदर्भात अर्ज केलेल्या युवकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे सरकारने हा आदेश मागे घेऊन विरोधकांची तोंडे बंद केली.

After Congress allegations Goa government withdrew recruitment order
IPS इंद्रदेव शुक्ला गोव्याचे नवे पोलिस महासंचालक

सरकारने 12 नोव्हेंबरला आदेश जारी करून कारकून, संदेशवाहू, चालक, स्टेनो टायपिस्ट, सचिव, साहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर तसेच ऑफिसबॉय ही पदे मनुष्‍यबळ विकास महामंडळामार्फत भरण्यात येतील, असे नमूद केले होते. या आदेशामुळे सध्या नोकर भरती प्रक्रियेत सामील झालेल्या उमेदवारांमध्ये गोंधळ उडाला होता. काँग्रेसने याविरुद्ध सरकारची भूमिका युवकांसमोर मांडत सरकार युवकांना फसवत आहे, याचा पर्दाफाश केला होता.

After Congress allegations Goa government withdrew recruitment order
गोव्यात भंडारी समाजाचे राजकारण करायला नाही तर त्यांचा हक्क मिळवून द्यायला आलोय

यासंदर्भात 15 नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले. आदेश सध्या सुरू असलेल्या नोकर भरतीसाठी लागू नसेल तर जे कर्मचारी रजेवर जातात व तेथे कर्मचाऱ्यांची अडचण होते त्या ठिकाणी महामंडळामार्फत त्यांच्याकडे असलेल्या यादीतील उमेदवारांची वर्णी लावली जाईल. मात्र, त्यांच्या स्पष्टीकरणानंतरही काही आमदारांनी या आदेशामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम उडाला असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर तो मागे घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com