Nirankal Hills: तब्बल आठ वर्षांनंतर निरंकाल टेकड्यांवर फुलली कारवी

आयुष्यात एकदाच फुलणारी कारवी वेधती आहे पर्यटकांचे लक्ष
Karvi
Karvi Danik Gomantak

पश्चिम घाटाबद्दल बोलताना पर्यावरण तज्ज्ञांना ही काय अन् किती माहिती सांगावी असा प्रश्न पडतो. कारण पश्चिम घाटातील विशिष्ट प्रजाती वनस्पती प्रजाती जगातील अनेकांच्या अभ्यास अन आकर्षणाच्या केंद्रस्थानी आहेत. याचा प्रत्यय पुन्हा एकदा येत असून तब्बल आठ वर्षांनंतर फोंडा दरम्यानच्या निरंकाल टेकड्यांवर कारवी फुलल्याचं दिसत आहे.

(After eight years nirankal hills ponda are flourish with the colour of karvi Strobilanthes callosa)

निरंकाल, फोंडा येथील पश्चिम घाटाच्या हिरव्यागार डोंगरावर जांभळ्या रंगाचे फुलांचे कारवीचे ताटवे आता दिसू लागले आहेत. हे ताटवे दर आठ वर्षांनी एकदा फुलतात त्यामूळे निरंकाल टेकड्या आता निळ्याभोर दिसू लागल्या आहेत.

कारवी वनस्पतीला वनस्पतिशास्त्रात Strobilanthes Callosa म्हणून ओळखले जाते. कारवी पूर्ण बहरल्यानंतर या फुलांच्या छटा बदलण्यास सुरु होतात. फुले फुलल्यानंतर एक किंवा दोन आठवड्यात गुलाबी आणि पांढऱ्या कळ्या जांभळ्या रंगाच्या जाड ठिपक्यांनी बदलत असल्याचे दिसू लागते.

Strobilanthes Callosa
Strobilanthes CallosaDanik Gomantak

कारवी आयुष्यात एकदाच फुलते

संपूर्ण पश्चिम घाटावर आढळणारे Strobilanthes callosa हे एक लक्ष वेधणारे झुडूप आहे, जे संशोधकांना ही आपल्याकडे आकर्षित करते. कारवी आयुष्यात एकदाच फुलते. फुलांच्या नंतर, वनस्पती फळांनी भरलेली असते, जी पूर्णपणे सुकायला एक वर्ष घेते. पुढील मान्सूनच्या आगमनाने ही फळे जमिनीवर पडतात अन् याचे बियाणे उगवण्यासाठीची प्रक्रिया पुन्हा सूरु होते. ज्याला सात वर्षांनी कारवी फुललेली दिसेल.

कारवीचा वापर आदिवासी झोपड्यांसाठी ही

“आठ वर्षांच्या कालावधीनंतरच त्याचे मोठ्या प्रमाणात फुललेले झुडूप तयार होते. पूर्वी, वाळलेल्या कारवीच्या झुडपाच्या काड्या स्थानिक आणि आदिवासी झोपड्या बांधण्यासाठी वापरत असतात, त्याच्या लवचिकतेमुळे ते वापरले जाते आहे. कारवीच्या फुलातून काढल्या जाणाऱ्या मधाला स्थानिक लोक कारवी मध म्हणून ओळखतात, जो रंग आणि चवीने वेगळा असतो.

सप्टेंबर 2015 मध्ये कारवी शेवटची फुलली होती

मिळालेल्या माहितीनुसार गोवा-कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागातील चोर्ला घाटावर कारवी शेवटची बहरली असल्याची काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. गोव्याच्या हद्दीत, सप्टेंबर 2015 मध्ये कारवी शेवटची फुलली होती.

सद्यस्थितीत निरंकाल येथील डोंगराळ भागात कारवीच्या झुडुपाचे गडद खोड मोठ्या फुलांच्या कळ्यांनी भरलेल्याचे चित्र आहे. पश्चिम घाटातील कारवीची ही विशिष्ट प्रजाती सप्टेंबरच्या अखेरीस पूर्ण बहरात येईल. कारवीच्या इतर प्रजाती देखील आहेत, ज्यांचे फुलांचे चक्र बारा वर्षांपर्यंत असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com