Bicholim परिसरात कचऱ्याच्‍या राशी!

गणेश चतुर्थीचा सण नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला, मात्र आता सर्वत्र कचरा दिसू लागला आहे.
Garbage
Garbage Dainik Gomantak

Bicholim Garbage: गणेश चतुर्थीचा सण नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र आता सर्वत्र कचरा दिसू लागला आहे. डिचोलीतील विविध भागात माटोळीच्या टाकाऊ वस्तू रस्त्याच्या बाजूने टाकण्यात आल्याचे दिसून येत आहे. आधीच विविध भागात कचरा समस्या कायम आहे. त्यातच माटोळीच्या वस्तू टाकण्यात आल्याने कचऱ्याची समस्या भयानक बनली आहे. सर्वण आदी काही भागात तर रस्त्याच्या बाजूने कचऱ्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. या प्रकाराबाबत जागृत नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.

डिचोलीतील विविध भागांत कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. स्वच्छता मोहीम आणि पालिकेसह बहुतांश पंचायत क्षेत्रात कचऱ्याची उचल होत असतानाही, ही समस्या काही कमी होत नाही. निर्जनस्थळांसह रस्त्याच्या बाजूने कचरा टाकण्याचे प्रकार चालूच आहेत. आता तर काही ठिकाणी या कचऱ्यात माटोळीच्या टाकाऊ वस्तूंची भर पडली आहे.

Garbage
गोव्यातील गुन्हेगारी थांबविण्यासाठी हा पर्याय अवलंबण्याची गरज!

डिचोली-साखळी (Sanquelim) रस्त्यावरील झांट्ये महाविद्यालय परिसरात कालव्याच्या धडेवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात आला आहे. सर्वण गावाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूने तसेच अन्य ठिकाणीही हे चित्र सध्या अनुभवयाला मिळत आहे.

Garbage
Land Grabbing Case : जमीन हडप प्रकरणात सुलेमानचा अटकपूर्व जामीन नामंजूर

विजयकुमार नाटेकर, पर्यावरणप्रेमी-

कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अनेक पर्याय आहेत. मात्र अनेकजण कचऱ्याची समस्या गंभीरतेने घेत नाहीत. त्यामुळे ही समस्या कायम आहे. माटोळीच्या टाकाऊ वस्तू, निर्माल्य किंवा अन्य कचऱ्याचा खत म्हणून चांगला उपयोग होऊ शकतो. पण त्याकडे कोणी लक्ष देत नाहीत. ही या समस्येमागील शोकांतिका आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com