प्रेमात दुरावा निर्माण झाल्यामुळे मैत्रिणीला ठार मारून त्यानेही संपवले जीवन

dainik gomantak news team
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

सोमवारी त्या युवतीच्या मृत्यूची चिकित्सा केल्यावर तिच्या गळ्याभोवती जखमा आढळून आल्या. तिला जबरदस्तीने पाण्यात बुडबून जीवे मारले असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलिस येऊन पोहोचले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी दिली.   

मडगाव- प्रेमात अंतर पडल्याने प्रेयसीला पाण्यात बुडवून ठार केले. त्यानंतर स्वत: आत्महत्या करून जीवन संपवल्याची घटना काल गोव्यात घडली होती आज सोमवारी त्या युवतीच्या मृत्यूची चिकित्सा केल्यावर तिच्या गळ्याभोवती जखमा आढळून आल्या. तिला जबरदस्तीने पाण्यात बुडबून जीवे मारले असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलिस येऊन पोहोचले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी दिली.   

दरम्यान, काल रविवारी राज्यातील दक्षिण गोव्यातील खड्डे-पाडी येथील एका ओहोळात याच भागातील अनिशा वेळीप ही युवती मृत अवस्थेत सापडली होती. त्यानंतर लगेचच कावरे येथे एका झाडाला गळफास लावून सर्वेश गावकर(वय 23) या युवकाने  आत्महत्या केली होती. मृत अनिशा आणि सर्वेश यांचे दोन वर्षांपासून प्रेम संबंध होते. मात्र, काही कारणास्तव दोघांमध्य़े दुरावा निर्माण झाला होता.  अऩिशा आपल्यापासून दूर जात असल्याने सर्वेशच्या मनात संशय निर्माण होत होता. रविवारी अनिशा कपडे धुण्यासाठी गेली असता, प्रथम तिला पाण्यात बुडवून त्याने ठार केले आणि नंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. 

काल अऩिशाच्या आईने सर्वेशला ओहोळजवळ जाताना पाहिले होते. त्यानंतर त्याने  तेथून पळ काढला. यानंतर पोलिसांना जेव्हा अऩिशाच्या मृत्यूनंतर सर्वेशही तिथे होता हे समजल्यानंतर पोलिसांनी कावरे येथे त्याच्या घरी जाऊन त्याचा शोध घेतला. मात्र, तो घरी नसल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. त्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली. यात घरापासून काही अंतरावरच एका झाडाला गळफास घेऊन त्यानेही आपले जीवन संपवल्याचे स्पष्ट झाले. 
     

संबंधित बातम्या