Goa Morjim Beach: कचऱ्यांच्या राशी तशाच; मोदींच्या वाढदिवसानंतर पुन्हा 'ये रे माझ्या मागल्याच'

Morjim Beach: दुसऱ्या दिवशी किनारी भागात फेरफटका मारला तर ठिकठिकाणी कचरा साचलेला दिसून आला.
Morjim Beach Garbage
Morjim Beach GarbageDainik Gomantak

Morjim Beach: मोठा गाजावाजा करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोव्यातील 160 किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनारी भागात एक दिवसाची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. किनारा स्वच्छ करण्याचा हा उपक्रम चांगला होता. परंतु दुसऱ्या दिवशी किनारी भागात फेरफटका मारला तर ठिकठिकाणी कचरा साचलेला दिसून आला.

मोरजी किनारी भागात तेमवाडा येथे ज्या ठिकाणी अरबी समुद्र आणि शापोरा नदीचे मीलन होते. त्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एक दिवसाच्या स्वच्छतेनंतर परत येरे माझ्या मागल्याच अशी स्थिती झाली आहे. कचरा उचलण्यासाठीचे कंत्राट ज्या कंपनीला दिलेले आहे, त्यांचे कामगार तो उचलत नसल्याने ठिकठिकाणी कचरा दिसून येतो.

Morjim Beach Garbage
Mapusa तील शौचालयांची पालिकेने कर्मचाऱ्यांसह केली पाहणी

मोरजी किनारी भागात कासव संवर्धन आरक्षित जागा ते होड्या ठेवणाऱ्या ठिकाणापर्यंत पर्यटन खात्याचे कंत्राटदार कचरा उचल करत नाहीत. त्यामुळे हा परिसर विद्रूप दिसत आहे. मागच्या दोन महिन्यांपूर्वी विदेशी पर्यटकांनी कचरा गोळा केला होता. आता येथील स्थानिक युवक आल्बर्ट फर्नांडिस यांनी पदरमोड करून चार कामगारांद्वारे येथील कचरा गोळा करून पर्यटन खात्याला जागे केले आहे.

Morjim Beach Garbage
International Award : गोव्याच्या अमेय चोडणकर यांना आंतरराष्ट्रीय 'टायटॅनियम लायन' पुरस्कार

कंत्राटदार कंपनीचे कचऱ्याकडे दुर्लक्ष: किनारी भागातील कचरा उचलण्याचे कंत्राट दृष्टी कंपनीला दिले आहे. त्यांचे कामगार कुठला कचरा गोळा करतात ते त्यांनाच माहीत. सरकारने या विषयावर गांभीर्याने विचार रावा. किनारी भागातील कचरा कंत्राटदारामार्फत व्यवस्थित उचलला जात नसल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

Morjim Beach Garbage
Goa Crime News: लंडनमध्ये बलात्काराचा आरोप; पोर्तुगीज नागरिकाला गोव्यात बेड्या

स्थानिक युवक: कासव संवर्धन मोहिमेच्या जागा आणि ज्या ठिकाणी पारंपरिक होड्या आहेत, त्यापर्यंत कचऱ्याच्या राशी दिसून येत होत्या. विदेशी पर्यटक त्या ठिकाणी चालत आले तर त्यांच्या पायाला काटे, काचा लागतात अशा तक्रारी आहेत. काही नागरिक तर समुद्रात आपल्या घरातील कचरा फेकतात. तो कचरा मग किनाऱ्यावर वाहून येतो. पर्यटन खात्याचे मंत्री बाबू आजगावकर यांचे या किनाऱ्यावकडेर लक्ष नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com