Goa Weather Updates: पावसानंतर आता राज्यावर पाच वादळांचे संकट

आजपासून राज्यात पाऊस उसंत घेईल, अशी शक्यता हवामान खात्याच्या वेधशाळेने वर्तविली आहे.
Goa Weather Updates: पावसानंतर आता राज्यावर पाच वादळांचे संकट
Goa Weather UpdatesTwitter/ @IMDgoa

पणजी: बंगाल आणि अरबी महासागरात येत्या काही दिवसांत पाच वादळे निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचा परिणाम राज्याच्या (Goa) वातावरणावरही (Weather) होणार असून तौक्ते वादळासारखे ही वादळे परिणामकारक असतील, अशी शक्यता हवामान खात्याच्या वेधशाळेने वर्तवली आहे.

राज्याला बुधवारी तुफान पावसाने झोडपले. सुमारे तासभर सर्वत्र पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे कामासाठी बाहेर पडणाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. तथापि, गुरुवारपासून राज्यात पाऊस उसंत घेईल, अशी शक्यता हवामान खात्याच्या वेधशाळेने वर्तविली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला होता.

एकीकडे राज्यातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी वाढत आहे, तर दुसरीकडे इफ्फी महोत्सव सुरू आहे. त्यावर गेल्या चार दिवसांंपासून पावसाने विरजण टाकले. एरवी सायंकाळी बरसणाऱ्या पावसाने आज बुधवारी सकाळीच धुव्वाधार हजेरी लावत सगळ्यांचीच तारांबळ उडविली. मंगळवारी इप्फीचे सर्व कटआऊटस् प्लास्टिकमुक्त करण्यात आले होते, ते बुधवारी दिवसभराच्या ढगाळ वातावरणामुळे पुन्हा झाकून ठेवावे लागले.

Goa Weather Updates
Goa Rain Updates: राज्यात पावसाचा ‘अलर्ट’ पुढील 3 दिवस कायम

पाऊस काही दिवस घेणार उसंत

पुढील काही दिवस राज्यात पाऊस उसंत घेणार आहे. अरबी समुद्रातील हालचाली कमी झाल्या आहेत. मात्र, कर्नाटकसह इतर राज्यांत पावसाचा जोर कायम असल्याने ऐनवेळी अलर्ट जारी केला जाऊ शकतो, असे गोवा वेधशाळेचे संचालक राहुल मोहन यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com